शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

विमानतळ उभारण्यासाठी आमचे रक्त सांडावे लागेल : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 7:01 PM

जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे

पुणे (सासवड) : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी नकाशा जाळून आपला तीव्र निषेध व्यक्त केला, त्यामुळे नजीकच्या काळात विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २८३२ हेक्टर वरती शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे त्यांचा नकाशा प्रसिद्ध केला आहे.  त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर व नकाशा प्रसिद्ध केलाच कसा ? असा प्रश्न उपस्थित करून तहसिलदार कचेरी वर  मोर्चा काढून तहसिलदार अतुल म्हेत्रे यांना निवेदन देवून शासनाचा जोरदार निषेध केला आहे.          छत्रपती संभाजीराजे आंतराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर येथे करणार असल्याचे मागील तीन वर्षांपासून शासनाकडून  सांगितले जात आहे. मात्र वृत्त पत्रा मधून वृत्त येते या व्यतिरिक्त प्रत्यक्ष रित्या या संभाव्य जागेत येणाऱ्या गावामध्ये शासनाच्या वतीने काहीच चर्चा, काम अथवा नियोजन शासनाकडून झाले नाही .या शासनाच्या फसव्या कृतीचा दखल घेत शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधा साठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.         दि.२४  मे रोजी शासनाच्या वतीने विमानतळ बाबत नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मध्ये शेतकऱ्यांना विमानतळा बाबत हरकत घ्यायची असल्यास नोटीस प्रसिध्द झाले पासून पुढील ६० दिवस कालावधी देण्यात आला आहे,  आणि विमानतळ बाधित क्षेत्राचा नकाशा हा शासकीय कार्यालयामधे उपलब्ध असेल असे त्या मध्ये नमूद केले होते .मात्र नोटीस प्रसिध्द होऊन सतरा  दिवस उलटले तरी अद्याप नकाशा मात्र शेतकऱ्यांना पाहायला पुरंदर तहसील येथे उपलब्ध झाला नाही, त्यामुळे विमानतळा बाबत शेतकऱ्यांचा तर कायम विरोध आहेच मात्र शासन देखील उदासीन वाटत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. विमानतळ पुरंदरला व हरकती नोंदविण्यास मुंबईला असे चित्र आहे. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करून हरकती देखील तहसिलदार पुरंदर येथे घेणेस शासनाने अंमलबजावणी करावी. नकाशा तहसिलदार पुरंदर यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध करावा, अशी मागणी विमानतळ विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. दत्तात्रय झुरंगे (अध्यक्ष विमानतळ विरोधी जन संघर्ष समिती)शेतकऱ्यांना जाहीर नोटीस द्वारे हरकत घेण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी दिला मात्र याबाबत शेतकऱ्यांना कल्पना नाही,  प्रशासकीय पातळीवर देखील नकाशा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला नाही , शासन जाणून बुजून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. सर्व विमानतळ बाधित शेतकरी या साठ दिवसाच्या कालावधीत विमानतळास विरोध म्हणून प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणार आहेत.

टॅग्स :purandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरी