शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आर्थिक अडचणीत

By admin | Updated: July 8, 2015 01:23 IST

राज्यातील भाजीपाला शेतमालाच्या घसरलेल्या दराचा परिणाम ग्रामीण अर्थकारणावर होत आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यासह दूध, डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे

रविकिरण सासवडे  बारामतीराज्यातील भाजीपाला शेतमालाच्या घसरलेल्या दराचा परिणाम ग्रामीण अर्थकारणावर होत आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यासह दूध, डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल मंदावली आहे. या परिसरातील उद्योगधंदे मंदीला तोंड देत आहेत. तसेच, शासनस्तरावर देखील शेतमालाच्या दराबाबत उदासीनता असल्याने हे चित्र बदलण्यास तयार नाही. शेतीमधूनच येणारे उत्पन्न थांबले आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा मेळ घालताना शेतकऱ्याच्या नाकीनऊ आले आहेत. बहुतेक शेतकरी जोडधंदा म्हणून दूधव्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. दूध व्यवसायामुळे शेतकऱ्याच्या हातात खेळते भांडवल राहते. मात्र मागील सात-आठ महिन्यांपासून दुधाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. २५ रुपयांवर असणारा दूधदर आज १५ ते १६ रुपयांवर आला आहे. मात्र बाजारात ग्राहकांना विक्री होणाऱ्या पँकिंगच्या दुधाचे दर जैसे थे आहेत. दूध दराचा उत्पादक ते ग्राहक या प्रवासात मोठ्या प्रमाणावर वाटमारी होत आहे. हा फरक उत्पादकाला मिळणाऱ्या दुपटीपेक्षा जास्त आहे. दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी उत्पादकाला २० रुपयांच्या खाली दर देऊ नये असा अध्यादेश काढला होता. तसेच कारवाई करण्याचाही धाकही खडसे यांनी दाखवला होता. मात्र हा केवळ एक फार्सच ठरला. ३.५ फॅट, ८.५ स्निग्धांशाला १६ रुपये दर सध्या दूध संस्थांकडून दिला जात आहे. पशुखाद्य, चारा यांचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादकाच्या हातात केवळ शेणच राहात आहे. ऊसउत्पादनाचा वाढता खर्च, त्यातून अडीच वर्षाच्या कालावधीत मिळणारा एकरी परतावा पाहता ऊसधंदा तोट्याचा झाला आहे. शेतकऱ्याच्या हक्काची असणारी एफआरपीदेखील त्याला मिळाली नाही. राज्य शासन आणि कारखाने यांची तू तू मै मै सुरूच आहे. यामध्ये शेतकरी मात्र भरडला जात आहे. यातून ऊसपिकापासून शेतकरी दुरावण्याची भीती आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रमुख कारणीभूत असणारा सहकार संपुष्टात येण्याची ही नांदी मानली जात आहे. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले होते. तेवढ्याच तत्परतेने कारखान्यांनीही एफआरपी देणे शक्य नसल्याचे सांगितले होते. एफआरपीप्रमाणे कोणत्याच कारखान्याने दर दिला नाही. त्यावर सहकारमंत्र्यांनीही कारवाई केली नाही. त्यामुळे ऊस उत्पादकाचाही एफआरपीबाबत भ्रमनिरास झाला. डाळिंब बागांचा सध्या मृग बहर सुरू आहे. मात्र तेल्या रोगाने हजारो हेक्टरमधील बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. रोगग्रस्त फळे मातीमोल किमतीत विकावे लागत आहे. २० किलोच्या एका कॅरेटला अवघा १०० रुपये दर मिळाला आहे. म्हणजे ५ रुपये किलोने डाळिंब उत्पादकाला आपले फळ विकावे लागत आहे. तेल्याच्या प्रादुर्भावाने लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या बागा तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.