शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

लाखेवाडी हल्ल्यातील कुटुंबाचे शासन पुनर्वसन करणार

By admin | Updated: June 29, 2015 23:47 IST

‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त

इंदापूर : ‘‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्येकी चाळीस हजार रुपये येत्या एक-दोन दिवसांत मिळतील,’’ अशी माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज (दि. २९) येथे पत्रकार परिषदेत दिली.अन्यायग्रस्त भिंगारदिवे कुटुंबास सामाजिक न्याय विभागाच्या वतीने घर बांधून देण्यात येईल. रहदारीसाठी डांबरी रस्ता तयार करून देण्यात येईल. पाणी, स्वच्छतागृहाचीही व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून दिलीप कांबळे म्हणाले, की भिंगारदिवे कुटुंबाकडे सहा एकर बागायत जमीन आहे. ती त्यांनी विकावी अथवा ती बळकावता यावी या दृष्टीने आरोपी त्यांच्यावर दबाव आणत होते. त्यातूनच हे हल्ला प्रकरण घडले आहे, असे आज भिंगारदिवे कुटुंबातील सदस्यांशी बोलताना आपल्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची जमीन त्यांच्या मर्जीशिवाय किमान वीस वर्षे तरी विकली जाणार नाही, अशी व्यवस्था आपण केली आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.कांबळे म्हणाले, की पोलीस यंत्रणेकडून आपण तपासाची माहिती घेतली आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. भा.दं.वि. कलम ३०७ लावण्यात आले आहे. प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत. मात्र गुंडवजा पैलवान असणारे व ज्यांनी अमानुष मारहाण केली ते २५ ते ३० जण अद्याप फरार आहेत. सर्व आरोपींना अटक करावी. कसल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असे आदेश आपण पोलीस यंत्रणेस दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे कांबळे म्हणाले.या घटनेमुळे आमच्या लाखेवाडी गावास हल्लेखोरांनी काळीमा फासला, अशी तेथील लोकांची प्रतिक्रिया आहे. मातंग समाजाची गावात केवळ दोनच घरे आहेत. एक तर मागासवर्गीयांकडे जमीनच नसते. ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर असे प्रसंग येतात, असे या वेळी बोलताना दिलीप कांबळे म्हणाले. दलित अत्याचाराबाबत अहमदनगरनंतर इंदापुरात असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतर दलितांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, या प्रश्नास उत्तर देताना, आपल्याला तसे वाटत नाही, असे कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले, की दलित अत्याचाराबाबत आमचे सरकार गंभीर आहे, अशी कृत्ये करणाऱ्या कुणालाही माफ केले जाणार नाही. कडक कारवाई करणार आहे, असेही त्यांनी संगितले. कुठल्याही दलित बांधवावर अन्याय झाला तर पहिल्यांदा रिपाइंच आवाज उठवते. त्यानंतर बाकीचे येतात. मग आमचे यामध्ये कुठे चुकते का, अशी विचारणा पत्रकार परिषदेत येऊन रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी थेट दिलीप कांबळे यांना केली. त्या वेळी सर्वच जण अवाक झाले. यावर दिलीप कांबळे तत्काळ उत्तरले, की रिपाइंचे काहीच चुकत नाही. बसून चर्चा करू, असेही मखरे यांना सुचवले.