पुणे : बनावट कागदपत्रांसह फेक मोबाइल ॲप्लिकेशन तयार करण्याच्या घटना वाढत आहेत. असाच काहीसा प्रकार पीएमपीच्या बाबत घडला आहे. पीएमपीच्या मूळ ॲप्लिकेशन सारखेच दिसणारे बनावट मोबाइल ॲप्लिकेशन तयार करून त्यावर खोटा दैनंदिन पास तयार करीत, त्या पासवर प्रवास करून पीएमपीची फसवणूक करणाऱ्या एका तरुणावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कौस्तुभ शैलेश मांजरेकर (वय २४, रा. प्रीतम हाईटस, बालाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीएमपीएमएलतर्फे मिठ्ठू साहेबराव बडे (वय ४५, रा. शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना भारती विद्यापीठ बीआरटी बस स्टॉपवर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौस्तुभ मांजरेकर हा नोकरदार असल्याने दररोज भारती विद्यापीठ बीआरटी बस स्टॉप येथून पीएमपी बसमधून प्रवास करत होता. त्यावेळी त्याने मिठ्ठु बडे यांना आपल्या मोबाइलवरील दैनंदिन पास दाखविला. तो पास पाहून त्यांना शंका आली. त्यांनी त्याची खात्री करण्यासाठी पीएमपी कार्यालयाशी संपर्क साधून त्याची खात्री करून घेतली. त्यात तो पास बनावट असल्याचे आढळून आले. कौस्तुभ मांजरेकर याने स्वत:च्या व इतरांच्या आर्थिक फायद्याकरिता पीएमपीच्या मूळ ॲप्लिकेशन सारखेच दिसणारे बनावट मोबाइल ॲप्लिकेशन तयार केले. त्यात ७० रुपयांचा खोटा दैनंदिन पास तयार केला व त्याचा वापर करून तो अधिकृत पासधारक असल्याचे भासविले. या पास द्वारे तो पुणे शहरामध्ये प्रवास करून त्याने पीएमपीची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे तपास करीत आहेत.
Web Summary : A youth was arrested for creating a fake PMP mobile app and using it to generate fraudulent daily passes. This resulted in financial losses for the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML).
Web Summary : एक युवक को फर्जी पीएमपी मोबाइल ऐप बनाकर जाली दैनिक पास बनाने और उपयोग करने के आरोप में गिरफ्तार किया गया। इससे पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड (पीएमपीएमएल) को वित्तीय नुकसान हुआ।