Pune Crime| निवृत्त आयएएस अधिकारी महिलेच्या मुलाच्या नावाने बनावट प्राप्तीकर भरणा

By नम्रता फडणीस | Published: August 24, 2022 01:11 PM2022-08-24T13:11:35+5:302022-08-24T13:12:59+5:30

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Fake income tax payment in the name of retired IAS officer woman's son | Pune Crime| निवृत्त आयएएस अधिकारी महिलेच्या मुलाच्या नावाने बनावट प्राप्तीकर भरणा

Pune Crime| निवृत्त आयएएस अधिकारी महिलेच्या मुलाच्या नावाने बनावट प्राप्तीकर भरणा

Next

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी महिलेच्या मुलाच्या पॅनकार्डचा गैरवापर करुन प्राप्तीकर भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  मुलाचे करपात्र उत्पन्न नसताना आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे भरणा करुन शासन तसेच प्राप्तीकर विभागाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

एका निवृत्त आयएएस अधिकारी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार करणारी माजी महिला अधिकारी पौड रस्ता परिसरात राहायला आहेत. त्यांचा मुलगा परदेशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्यांच्या मुलाला प्राप्तीकर भरणा करायचा होता. त्यामुळे महिला अधिकाऱ्याने प्राप्तीकर विभागात जाऊन माहिती घेतली. त्या वेळी मुलाने २०११ पासून नियमित प्राप्तीकर भरणा केल्याचे सांगण्यात आले. प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर महिला अधिकाऱ्याला धक्का बसला. चौकशीत त्यांच्या मुलाच्या पॅनकार्डचा गैरवापर करून बनावट प्राप्तीकर भरणा केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, त्यांच्या मुलाच्या नावाने वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) भरणा करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर निवृत्त महिला अधिकाऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस हाके तपास करत आहेत.

Web Title: Fake income tax payment in the name of retired IAS officer woman's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.