शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी

By admin | Updated: May 15, 2015 05:18 IST

इंदापूर शहरातील पाटील बंगला परिसर व गणेशनगर भागात गुरुवारी (दि. १४) पहाटे दीड ते तीनच्या दरम्यान धारदार शस्त्राचा धाक दाखवून

इंदापूर : इंदापूर शहरातील पाटील बंगला परिसर व गणेशनगर भागात गुरुवारी (दि. १४) पहाटे दीड ते तीनच्या दरम्यान धारदार शस्त्राचा धाक दाखवून व जबर मारहाण करून जबरी चोरी केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेत पती-पत्नी जबर जखमी झाले आहेत. इंदापूर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमुळे शहराच्या वाढीव हद्दीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली घटना गणेशनगर भागात उत्तरेश्वर शंकर लोंढे यांच्या घरी घडली. लोंढे, पत्नी व दोन मुलांसह घरी झोपले होते. पहाटे दीड ते दोनच्या सुमारास त्यांच्या स्वयंपाकघराच्या दाराचा कोयंडा कटावणीने उचकटून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी बेडरूमचे दार ठोठावले. लोंढे यांनी झोपेतच दार उघडले. त्यांना काही कळायच्या आत घरात शिरलेल्या चोरट्यांनी हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कपाटातील सामान उचकटून, दीड तोळे सोने, अठरा हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.दुसरी घटना तीनच्या सुमारास पाटील बंगला परिसरातील सोमनाथ गार्डे यांच्या बंगल्यात भाड्याने राहणाऱ्या कैलास चंद्रकांत गाडे यांच्या घरी घडली. पहाटे तीनच्या सुमारास हातात चाकू व लाकडी दांडकी असलेल्या तीन चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील कपाटामधील ४५ हजार रुपयांचा तीन तोळ्यांचा राणीहार,आठ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. त्यानंतर हॉलमध्ये येऊन गाडे यांना झोपेतून उठवले. काही कळायच्या आत त्यांनी गाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चाकूने कपाळ, नाक डोक्याच्या पाठीमागे वार केले. पत्नी मध्ये पडल्यानंतर तिच्या डाव्या पायावर लाकडी दांडक्याने मारण्यात आले. मंगळसूत्र हस्तगत केले. गाडे दाम्पत्य व घरी आलेल्या पाहुण्यांना बेडरूममध्ये कोंडून चोरटे निघून गेले.या दोन्ही ही प्रकारांत चोरट्यांनी स्वयंपाकघरातून घरात प्रवेश केला. लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार चोरटे होते. त्यापैकी एकाने तोंडावर फडके बांधले होते. चौघेही मराठीत बोलत होते, असे संशय लोंढे यांनी सांगितले. (वार्ताहर)