पुण्यातील खळबळजनक घटना! चोरट्याने ६५ लाखांचे तब्बल १०५ आय फोन केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:38 IST2023-07-17T14:38:33+5:302023-07-17T14:38:55+5:30
वेअर हाऊसचा पत्रा फोडून त्यावाटे चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला

पुण्यातील खळबळजनक घटना! चोरट्याने ६५ लाखांचे तब्बल १०५ आय फोन केले लंपास
किरण शिंदे
पुणे: पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरटयाने ६५ लाख रुपयांचे आय फोन १४, आय फोन १४ प्रो कंपनीच्या वेयर हाऊस फोडून पळवले आहेत. वाघोली भागात ही घटना घडली असून वैभव झेंडे यांनी याप्रकरणी लोणी कंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी कंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे फिर्यादी हे वेअर हाऊस बंद करून निघून गेले. रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन कंपनीचे सिमा वेअर हाऊस मधील वरील सिमेंटचा पत्रा फोडुन त्यावाटे आत मध्ये प्रवेश केला. ६५ लाख रुपये किमतीचे अॅपल कंपनीचे आयफोन १३, आयफोन १४ आयफोन १४ प्रो या मॉडेलचे वेगवेगळ्या रंगाचे एकूण १०५ मोबाईल सेट व ०१ मोबाईल चार्जंग ५ अॅडपटर केबल सह लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी हाऊस उघडल्यावर हा सगळा प्रकार लक्षात आला आणि फिर्यादी यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. लोणीकंद पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.