खळबळजनक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवले; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 19:02 IST2021-02-12T19:01:12+5:302021-02-12T19:02:29+5:30
पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

खळबळजनक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवले; पुण्यातील घटना
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार एस एस पी एम एस क्वाटर्स इथे घडला आहे. या घटनेत सुरेखा दत्तात्रय कसबे (वय 30) या भाजल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी पती दत्तात्रय सुरेश कसबे (वय 38) याच्याविरुद्ध पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश कसबे हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे. तुझे बाहेर काहीतरी चालू आहे, असे म्हणत त्याने सुरेखा सोबत भांडणे केली. या भांडणात सुरेखा यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले, पती सुरेश याने तिला पेटवून दिले. तिला पेटवून देऊन तातडीने पती सुरेश हा फरार झाला. सुरेखा हिने दिलेल्या तक्रारीवरून सुरेश कांबळे याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गुन्हे अभय महाजन करीत आहेत.