शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारपासून मिळणार दिवसाआड पाणी

By admin | Updated: July 15, 2014 04:03 IST

पिंपरी-चिंचवडकरांना १७ जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पवना धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांना १७ जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पवना धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात अनिवार्य असल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे महापालिकेला भाग पडले आहे. प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून पिण्याचे पाणी अन्यत्र वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी दिली. महापौर मोहिनी लांडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले, ‘‘पावसाने ओढ दिली आहे. जून महिना कोरडा गेला. जुलै महिना अर्धा झाला, तरीही पाऊस आलेला नाही. पवना धरण क्षेत्रातही पाऊस नसल्याने यापुढील काळात पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत २३ जूनला झालेल्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला असता १८.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पवना धरणातून होणारा दररोज विसर्ग विचारात घेता हा साठा ३० आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच होता. महापालिकेने २ जुलैपासून दिवसातून १ वेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. त्यानंतरही पाऊस झाला नाही. आजअखेरीस पवना धरणामध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या वर्षी आजअखेरीस धरण परिसरात अवघा १५५ मिलीमीटर पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक सोमवारी झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)