शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

अखेर कचरा बकेट खरेदी बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 12:56 PM

दरवर्षी बहुतेक नगरसेवकांकडून दहा-दहा लाख रुपयांचा निधी केवळ ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना बकेटचे वाटप करण्यात येते.

ठळक मुद्देस्थायी समिती बैठकीत धोरणाला मान्यता : पाच वर्षांत १५ कोटींच्या बकेट खरेदी

पुणे : अनेक वर्षांपासून नगरसेवकांकडून ओला-सुका कचरा वर्गीकरणाच्या नावाखाली कचरा बकेट खरेदीवर सुरू असलेली उधळपट्टी अखेर बंद होणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही बकेट खरेदीस बंदी घालण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास प्रशासनाला मान्यता दिली. दरवर्षी बहुतेक नगरसेवकांकडून दहा-दहा लाख रुपयांचा निधी केवळ ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना बकेटचे वाटप करण्यात येते. यामध्ये गेल्या पाच वर्षांत केवळ बकेट खरेदीवर तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च केला असून, ११ लाख बकेटचे वाटप केले आहे. यामध्ये प्रशासनाने केलेल्या सर्व्हेनुसार शहरातील एकूण कुटुंबांची संख्या लक्षात घेता, आतापर्यंत एका कुटुंबाला किमान तीन ते चार वेळा बकेटचे वाटप केले आहे. त्यानंतरदेखील नागरिकांकडून कचरा वर्गीकरणासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यामध्ये अनेक ठिकाणी या कचऱ्याच्या बकेटचा वापर कचऱ्याऐवजी पाणी भरून ठेवणे अथवा रोपे लावण्यासाठी कुंडी म्हणून होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळेच गत वर्षी प्रशासनाने बकेट खरेदीला लगाम लावण्यासाठी काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रशासनाच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी विरोध केल्याने बकेट खरेदी सुरूच राहिली. ............नगरसेवकांकडून बकेट खरेदीचा मात्र अग्रह* याबाबत बकेट खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असून, यासाठीच नगरसेवकांकडून बकेट खरेदीचा अग्रह धरला जात असल्याची टीका सुरू झाली. यामुळे अखेर याबाबत पक्षनेतेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. * पक्षनेत्यांनी याबाबत स्वतंत्र धोरण करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बकेट खरेदी बंद करण्याच्या प्रस्तावासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यास मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका