शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

फरासखाना स्फोटाच्या एक वर्षानंतरही तपास अधांतरीच

By admin | Updated: July 10, 2015 02:17 IST

पाच दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी पुण्याच्या मध्यवस्तीतील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बॉम्बस्फोट घडवत पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते.

पुणे : मध्यप्रदेशातील खांडवा कारागृह फोडून पसार झालेल्या पाच दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी पुण्याच्या मध्यवस्तीतील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बॉम्बस्फोट घडवत पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते. या पाच दहशतवाद्यांपैकी दोघाजणांना एप्रिल महिन्यात आंध्रप्रदेश पोलिसांनी चकमकीदरम्यान कंठस्नान घातले होते. यातील तीन दहशतवादी अद्यापही मोकाट असून या स्फोटाच्या एक वर्षानंतरही दहशवतवाद्यांना बेड्या ठोकण्यात यंत्रणांना यश आलेले नाही. मोहम्मद एजाजुद्दीन उर्फ एजाज उर्फ रियाज उर्फ राहुल (वय ३२), मोहम्मद अस्लम अयुब खान (वय २८), अमजद रमजान खान (वय ३५), झाकीर हुसैन बदुल हुसैन ऊर्फ सादिक (वय ३३), मोहम्मद सलिक ऊर्फ सल्लू अब्दूल हकीम (वय ३२, सर्व रा. गणेश तलाई, खांडवा, मध्यप्रदेश) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकावर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात हे पाचही दहशतवादी खांडवा कारागृहात बंद होते. तेथून पसार झाल्यानंतर त्यांनी राहणीमानात बदल केला होता. एजाजुद्दीन आणि अस्लम या दोघांनी खांडवा कारागृहामधून १ आॅक्टोबर २०१३ रोजी पलायन केले होते. त्यांच्यासोबत डॉ. अबू फैजल इम्रान, मेहबुब उर्फ गुड्डु इस्माईल खान, अमजद रमजान खान, झाकीर हुसेन उर्फ सादीक उर्फ विकी डॉन उर्फ विनयकुमार बद्रुल हुसेन हे चौघेही होते. पळून गेल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच डॉ. अबू फौजलला अटक करण्यात आली होती. हे सर्व संशयीत सिमी सिमी आणि इंडीयन मुजाहीदीनचे हे सर्वजण ‘डेडीकेटेड’ दहशतवादी आहेत. खांडव्यामधून पसार झाल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवला होता. त्यासाठी सातारच्या न्यायालयामधून एका पोलिसाची दुचाकी चोरण्यात आली होती. या दुचाकीच्या डिक्कीमध्ये बॉम्ब पेरुन ही दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली होती. गेल्या वर्षी १० जुलै रोजी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट झाला होता. दहशतवादी हल्ल्याचा कायमस्वरुपी धोका असलेल्या दगडुशेठ मंदिराच्या अगदी जवळच हा स्फोट झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहीले होते. फरासखाना बॉम्बस्फोट घडविल्यानंतर हे संशयीत दक्षिणेत पळाले होते. एटीएसने त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी पुण्यात घुसण्यापासून ते कोल्हापुरला पळून जाईपर्यंतच्या काही मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. या सीसीटीव्हीमधून एजाजुद्दीनसह अन्य दहशतवाद्यांचे स्पष्ट फुटेज पोलिसांना मिळाले होते. एटीएसने राज्यभर या दहशतवाद्यांची छायाचित्र असलेली पत्रके आणि पोस्टर्स वाटली होती.एटीएससह सर्वच यंत्रणा मागावरफरासखान्याचा स्फोट घडवल्यानंतर फरारी झालेल्या या दहशतवाद्यांनी बिजनौरमध्ये वास्तव्य केले होते. तेथे घरामध्ये बॉम्ब तयार करीत असताना प्रेशर कुकरचा स्फोट झाला होता. या घटनेत मेहबूब गुड्डू भाजला होता, अशी माहिती एटीएसकडे आहे. त्यानंतर पसार झालेले दहशतवादी उत्तर प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. त्यांचे शेवटचे ‘लोकेशन’ कर्नाटकातील होसेपेटे येथे मिळाले होते. हे सर्व दहशतवादी हैदराबादमध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. एप्रिल महिन्यात आंध्र प्रदेश पोलिसांसोबत नालगोंडा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत एजाजुद्दीन आणि मोहम्मद अस्लम या दोघांना कंठस्थान घालण्यात आले होते. त्यांचे साथीदार अमजद, सादिक आणि मोहम्मद सलिक अद्याप फरार आहेत. एटीएससह देशातील सर्वच यंत्रणा त्यांच्या मागावर असून, अद्याप कोणत्याही यंत्रणेला त्यांचा ठावठिकाणा समजलेला नाही.