ED action in Pune | ईडीची पुण्यात मोठी कारवाई; ७ कोटी रुपयांची रोकड आणि दीड कोटींचा फ्लॅट जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:47 AM2022-04-27T10:47:15+5:302022-04-27T10:55:04+5:30

या प्रकरणात आरोपींविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा करून दोषारोपपत्र सादर केले होते..

enforcement directorate action in pune city flat worth 1.5 crore confiscated | ED action in Pune | ईडीची पुण्यात मोठी कारवाई; ७ कोटी रुपयांची रोकड आणि दीड कोटींचा फ्लॅट जप्त

ED action in Pune | ईडीची पुण्यात मोठी कारवाई; ७ कोटी रुपयांची रोकड आणि दीड कोटींचा फ्लॅट जप्त

googlenewsNext

पुणे : सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शहरातील दीड कोटी रुपयांचा एक फ्लॅट मंगळवारी जप्त करण्यात आला. तसेच बनावट कागदपत्रांद्वारे एका ट्रस्टच्या मिळकतीची विक्री करून आलेली ७ कोटी १७ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

शहरातील ताबूत इमाम एंडाउन्मेंट ट्रस्टची (टीआयइटी) मिळकत बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. याप्रकरणी इम्तियाज मोहम्मद हुसेन, चांद रमजान मुलाणी, सतीश राजगुरू, संतोष कांबळे, मोहम्मद इशारक शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे ट्रस्टचे विश्वस्त असल्याचेे भासवून मिळकतीची शासनाला ८ कोटी ६७ लाख रुपयांना विक्री केली होती. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत ट्रस्टच्या नावे खाते उघडले होते. आरोपींनी या पैशांतून दीड कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. या प्रकरणात आरोपींविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा करून दोषारोपपत्र सादर केले होते.

ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी कारवाई करून हा फ्लॅट आणि आरोपींनी उघडलेल्या बँक खात्यातील रक्कम जप्त करण्यात आली. मनी लॉडिंगप्रकरणी ईडीकडून अधिक चौकशी सुरू आहे.

Web Title: enforcement directorate action in pune city flat worth 1.5 crore confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.