Shirur Fire: चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:27 IST2025-02-17T12:26:25+5:302025-02-17T12:27:32+5:30
अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नंतर आग आटोक्यात आली, परंतु तो पर्यंत कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते

Shirur Fire: चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक
शिरूर : शिरुर चौफुला मर्गावर न्हवरा येथे चारचाकी गाडी विद्युत रोहित्रावर आदळून झालेल्या अपघातात रोहित्र खाली कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत प्लास्टिक कंपनी जळून खाक झाल्यची घटना आज सकाळी घडली.
चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक, शिरूर तालुक्यातील घटना #Pune#shirur#firepic.twitter.com/HzrO8rETAr
— Lokmat (@lokmat) February 17, 2025
याबाबत प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याजवळ एका चारचाकी गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी जवळील विद्युत रोहित्रावर आदळली. यामुळे रोहित्र खाली कोसळले. यामुळे शेजारील त्रिमूर्ती प्लास्टीक कंपनीत शॉर्टसर्किट झाले व आग लागली. काही वेळात आगीने रऊद्र रूप धारण केले. कंपनीत लाखो रुपयांचा कच्चा माल होता. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग वाढतच गेली. महिती मिळाल्यानंतर रांजणगाव ओद्योगिक वसाहतीचा एक अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमानच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पाणी कमी पडत होते. अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नंतर आग आटोक्यात आली. परंतु तो पर्यंत कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते.