शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

निवडणुका, उत्सव, मोर्चे आणि आता संचारबंदी! पोलिसांच्या क्षमतेला पण मर्यादा असतीलच ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 9:37 AM

सततच्या बंदोबस्ताने पोलीस हैराण

ठळक मुद्देबंदोबस्ताचा सर्व भार पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचार्‍यांवर

पुणे : लोकसभा, पाठोपाठ विधानसभा, गणपती, दिवाळी यांचा बंदोबस्त, त्यानंतर एनआरसी विरोधी व समर्थनार्थ निघालेले मोर्चे असा सातत्याने बंदोबस्तात पोलीस अडकले होते.  आता लॉक डाऊनच्या बंदोबस्ताने त्यावर कडी केली आहे. एका बाजूला कितीही सांगितले तरी लोक रस्त्यावर येण्याचे थांबत नाही. दुसरीकडे काठी दाखविली तर तेथून आरडाओरडा, त्यात अहोरात्र गल्ली बोळात बंदोबस्त करावा लागत असल्याने पोलीस हैराण झाले आहेत. शहरातील लॉक डाऊनच्या बंदोबस्ताचा सर्व भार पोलीस ठाण्यातील तुटपुंजा अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर पडला आहे. दुसरीकडे नियंत्रण कक्ष आणि अन्य शाखांमधील अधिकारी आणि कर्मचारी, गुन्हे शाखेतील कर्मचारी निवांत आहेत. याबाबत एका पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, पहाटेपासून भाजी मंडई येथे बंदोबस्त लावावा लागतो. सकाळ, संध्याकाळ लोक अकारण घराबाहेर पडत आहेत. प्रत्येक जण मेडिकल नाही तर किराणाचे कारण देतो. अनेकांकडे तर सामान घेण्यासाठी साधी पिशवीही नसते. अशा वेळी पोलीस लोकांना हात जोडून किती वेळ सांगणार की घरी जा.कोरोना विषाणूचा आपल्यालाही संसर्ग होईल की काय अशी रस्त्यावर सातत्याने असलेल्या पोलिसांच्या मनात भीती आहे. मात्र, ड्युटी सोडून त्याला जाता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांवर ताण आहे.त्यावरही आम्ही उपाय करण्याचा, त्यांना जास्तीत जास्त सोयीस्कर होईल, अशा ड्युटी देण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणालाही सलग ३ तासांपेक्षा अधिक वेळ नाकांबदीची ड्युटी येणार नाही, यासाठी प्रयत्न करीत आहोत. आज नाकाबंदीची ड्युटी दिली तर दुसर्‍या दिवशी गस्त घालण्याची ड्युटी दिली जात आहे. त्यावेळी इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी निवांत असून सर्व भार पोलीस ठाण्यांवर टाकला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सवElectionनिवडणूक