शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या विलंबाचा राष्ट्रवादी, बसपाला फायदा

By admin | Updated: September 12, 2015 01:49 IST

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला आहे.

- सुधीर लंके,  पुणेलोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला आहे. मात्र त्यांचा दर्जा रद्द करण्याबाबत अद्यापही आयोगाच्या पातळीवर सुनावणीच सुरू असल्याने बिहार निवडणुकीतही त्यांचा हा दर्जा व मतदान यंत्रावरील त्यांचे वरचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय पक्षांचा दर्जा टिकविण्याइतकी कामगिरी न झाल्याने २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला. यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याबाबत आयोगाने त्यांना नोटीस बजावलेली असून, त्याची सुनावणीही सुरू आहे. मात्र ही सुनावणी अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. पक्षांची लोकसभेतील कामगिरी अथवा कुठल्याही चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील कामगिरी पाहून दर्जाबाबत निर्णय घेतला जातो. प्रत्येक निवडणुकीनंतर तातडीने हे मूल्यमापन अपेक्षित असते. राष्ट्रीय जनता दलाचा राष्ट्रीय दर्जा याच पद्धतीने २००९च्या लोकसभा निवडणुकीनंतर तातडीने रद्द झाला होता. उपरोक्त तीन पक्षांच्या निर्णयाला मात्र विलंब झाला आहे. निर्णय न झाल्याने लोकसभा निवडणुकीनंतरही दिल्ली व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा राष्ट्रीय दर्जा कायम होता. आता बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरहीत्यांचा दर्जा जैसे थे राहण्याचीशक्यता आहे. दर्जाबाबतचानिर्णय आता बिहार निवडणुकीनंतरच होईल, अशी शक्यता निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी वर्तवली. निर्णयातील विलंबाचा या पक्षांना फायदा मिळताना दिसतआहे. बिहारकडे लक्ष- बसपाला सध्या तीन राज्यांत राज्य पक्षाचा दर्जा आहे. बिहारमध्ये त्यांनी राज्य पक्षाच्या दर्जाएवढी कामगिरी केली तर त्यांचा राष्ट्रीय दर्जा कायम राहील. त्यामुळे त्यांच्यासाठी ही संधी आहे.- दर्जा धोक्यात येऊनही या पक्षांनी तीन निवडणुका राष्ट्रीय पक्ष म्हणूनच लढविल्याने वैधानिक प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.