शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

जुन्नरचा पूर्व भाग पाण्याअभावी तहानलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:37 IST

चाऱ्यासाठी जनावरांची वणवण; आणे, शिंदेवाडी, नळावणे, पेमदरा या गावांत पाणीटंचाई

आणे : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पठारावर असलेल्या आणे, शिंदेवाडी, नळावणे, पेमदरा या चारही गावांत पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून शेतकऱ्यांवर जनावरांसाठी पाणी व चाºयासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या या चारही गावांत या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने आक्टोबरपासूनच पिण्याच्या पाणीटंचाई भासू लागली आहे. शिंदेवाडी व पेमदरा परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.आणे गावठाण हद्दीत बेल्हे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी येते; परंतु तेही कधी दिवसाआड, तर कधी दोन दिवसांनी मिळते. इतर वस्त्यांसाठी १० हजार लिटरचा एक टँकर असून त्याच्या दररोज फक्त दोनच फेºया होतात. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी नोंदविल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी पाणी मिळते. तेही वस्त्यांवरील विहिरीत सोडल्यावर पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे अनेकांना पिण्यासाठी जार विकत घ्यावे लागतात.आणे गावाच्या हद्दीत सहा पाझर तलाव आहे. शिवाय, ओढ्यावर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. परंतु, या वर्षी एकही मोठा पाऊस न झाल्याने सर्व तलाव व विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे या वर्षी पिके तर नाहीतच; पण जनावरांसाठी चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पठारावरील अनेक शेतकऱ्यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय असून हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे; परंतु जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकºयांवर आपली दुभती जनावरे कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. आणे पठारावर चारही गावांमध्ये पशुवैद्यकीय अहवालानुसार ६,७२६ इतके पशुधन असून त्यामध्ये दुभत्या जनावरांची संख्या अधिक आहे. दुग्धव्यवसाय हा येथील शेतकºयांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून पाणी व चाºयाअभावी हा व्यवसायही अडचणीत आला आहे.शिंदेवाडी गावाच्या हद्दीत तीन पाझर तलाव, दहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व दोन गावतळी असून त्यातील पाणी सहा महिन्यांपूर्वीच संपले आहे. तीन हजार लोकवस्ती असलेल्या शिंदेवाडी हद्दीतील कापुरवाडी, इटकाईमळा, जांभळविहिरा, उक्तावस्ती, हांडेवस्ती, कुंभारशेत, वाघाटीमळा तसेच शिंदेवाडी गावठाणसाठी एकच टँकर असून प्रत्येक वस्तीवर ८ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनेकदा टँकर नादुरुस्त झाल्याने वेळेवर पाणी मिळत नाही, अशी तेथील ग्रामस्थांची तक्रार आहे.दुष्काळाचा लाभ मिळावा, यासाठी पारनेरमध्ये समावेशाची मागणीआणे पठार जुन्नर व पारनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असून तीन बाजूंनी पारनेर तालुक्याने वेढलेले आहे. पारनेर तालुक्यात नेहमीच दुष्काळ जाहीर होत असल्याने तेथील शेतकºयांना अनेक सवलतींचा फायदा मिळतो; परंतु आणे पठारची भौगोलिक स्थिती पारनेरसारखीच असूनही केवळ जुन्नर तालुक्यात असल्याने तेथील शेतकºयांना कोणत्याही सवलतींचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा भाग पारनेर तालुक्याला जोडण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई