अंगावर गाडी घालून फरफटत नेले; मद्यधुंद कार चालकाने ट्रॅव्हल्स चालकाला चिरडले, पुण्यातील संतापजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:03 IST2026-04-13T17:57:03+5:302026-04-13T18:03:45+5:30

किरकोळ वादातून दारूच्या नशेत असणाऱ्या कार चालकाने ट्रॅव्हल्स चालकाच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना फरफटत नेले.

Drunk car driver crushes travel driver shocking incident in Pune | अंगावर गाडी घालून फरफटत नेले; मद्यधुंद कार चालकाने ट्रॅव्हल्स चालकाला चिरडले, पुण्यातील संतापजनक प्रकार

अंगावर गाडी घालून फरफटत नेले; मद्यधुंद कार चालकाने ट्रॅव्हल्स चालकाला चिरडले, पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे: मद्यधुंद कार चालकाने ट्रॅव्हल्स चालकाला धडक देऊन त्याला फरफटत नेले. चालक खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी घातल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उरळी देवाची येथे घडला आहे. सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे. याबाबत विजय तानाजी शिर्के (वय ४१, रा. सातवाडीस, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. ब्रोथी, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि मयत यांच्या ट्रॅव्हल्स बस आहेत. मयत सायकर हे चालक म्हणून काम करत होते. दोन ट्रॅव्हल्स घेऊन ते १२ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता वडकी येथून काही महिलांना घेऊन अक्कलकोट येथे जाणार होते. हडपसर–सासवड मार्गावर दोन्ही ट्रॅव्हल्सच्या मध्ये एक चारचाकी कार येऊन जागा देत नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांनी ट्रॅव्हल्स बस थांबवून मागून येणाऱ्या कारला थांबवून काय अडचण आहे, असे विचारले. यावेळी मयत सायकर आणि अभिजीत जमदाडे येथे उभे होते. त्यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या कार चालकाने सायकर यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना फरफटत नेले. ब्रेक लावल्याने सायकर खाली पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून पुन्हा कार घालून त्यांना गंभीर जखमी केले. सायकर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Web Title : पुणे: नशे में धुत ड्राइवर ने ट्रैवल्स चालक को कुचला, घसीटा।

Web Summary : पुणे में, नशे में धुत ड्राइवर ने ट्रैवल्स चालक सागर सायकर को कुचल दिया और उसे कार से घसीटा। आरोपी कृष्णा कोइलवाड को हडपसर-सासवड रोड पर घटना के बाद गिरफ्तार किया गया। अस्पताल में सायकर की मौत हो गई।

Web Title : Drunk Driver Kills Travels Driver in Pune, Drags Body.

Web Summary : In Pune, a drunk driver fatally struck a travels driver, Sagar Saikar, dragging him with the car. The accused, Krishna Koilwad, has been arrested after the incident on Hadapsar-Saswad Road. Saikar died in hospital.