Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:26 IST2026-04-13T10:11:53+5:302026-04-13T19:26:23+5:30

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 13 April 2026: US Iran war talks highlights, Donald Trump, Israel, Benjamin Netanyahu, Asha Bhosle Funeral, CM Devendra Fadnavis, PM Narendra Modi, Ashok Kharat Crime Case, IPL 2026 | Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई

Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

13 Apr, 26 : 07:25 PM

नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई

महसूल गुप्तचर यंत्रणेने एक मोठी कारवाई सोमवारी केली. नागपूरमध्ये राजधानी एक्स्प्रेसमधून घेऊ जात असलेला तब्बल ४.२६ कोटी रुपयांचा कोकेन साठी जप्त करण्यात आला. सिनेस्टाईल पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली असून, महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या साथीदारांचा सध्या शोध सुरू आहे. 

13 Apr, 26 : 06:36 PM

होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक

इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव वाढला आहे. अमेरिकेने नाकेबंदी करण्याचाच इशारा दिला आहे. ब्रिटन आणि फ्रान्सने हा तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

हा समुद्री रस्ता खुला करण्यासाठी आणि जहाजांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बहुराष्ट्रीय योजना आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठी जगातील ४० पेक्षा जास्त देशांची बैठक बोलवण्यात येईल, असे ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्म यांनी जाहीर केले आहे. 

13 Apr, 26 : 06:36 PM

भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी 

नाशिक : भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली.खरात व्हिसीद्वारे न्यायालयासमोर हजर झाला तर सरकारी वकील, भोंदू खरातचे वकील आणि एसआयटीचे अधिकारी यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावली. खरात यास चौथ्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज सादर केला.

13 Apr, 26 : 05:21 PM

आशाताईंना अखेरचा निरोप, कुटुंबाला झाले अश्रू अनावर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या भावनिक क्षणी कुटुंबाला अश्रू अनावर झाले. आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर दिग्गज नेते आणि कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात आशाताईंना अखेरचा निरोप देण्यात आला.

13 Apr, 26 : 05:19 PM

आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

कोट्यवधी रसिकांच्या काळजात घर करणारा एक स्वर पंचत्वात विलीन झाला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी अखेरचे दर्शन घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

13 Apr, 26 : 05:19 PM

अमेरिकेची धमकी, तरीही चार जहाजांनी पार केली होर्मुझ सामुद्रधुनी

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या बंदरावर प्रवेश करण्यास आणि तिथून बाहेर पडण्यास बंदी घातलेली असतानाच चार जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली. 

मरीनट्रॅफिकच्या माहितीनुसार हे चारही जहाजे तेल, गॅस किंवा पेट्रोलियम रसायने भरलेली आहेत. ही जहाजे कोणत्या बंदरातून बाहेर पडली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. त्या बंदरांकडूनही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

13 Apr, 26 : 05:03 PM

आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

गायिका आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार, हजारोंच्या संख्येने चाहते शेवटचा निरोप देण्यासाठी जमले. अनेक मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

13 Apr, 26 : 03:47 PM

आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व. आशा भोसले यांनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

13 Apr, 26 : 03:15 PM

आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

गायिका आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार, हजारोंच्या संख्येने चाहते शेवटचा निरोप देण्यासाठी जमले. अनेक मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

13 Apr, 26 : 02:38 PM

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प

कर्मचाऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प झाले आहे. 

13 Apr, 26 : 02:20 PM

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू

 

ठाणे : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एको टॅक्सी आणि सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. मृत सर्वजण मुरबाड तालुक्यातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे समजते. सविस्तर वृत्त

13 Apr, 26 : 11:58 AM

कल्याण अहिल्यानगर महामार्गावर कार आणि सिमेंट मिक्सर यांच्यात जोरदार धडक; ८ जण ठार झाल्याची माहिती

कल्याण अहिल्यानगर महामार्गावर कार आणि सिमेंट मिक्सर यांच्यात धडक यांच्यात जोरदार धडक झाली.  या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली असून ८ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
 

13 Apr, 26 : 11:50 AM

खरात प्रकरणी ईडीची कारवाई, ११ ठिकाणी टाकली धाड

भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीने ११ ठिकाणी छापेमारी केली. नाशिक, शिर्डी, पुण्यात ईडीने टाकली धाड. मालमत्तेची चौकशी सुरू आहे. 

13 Apr, 26 : 11:22 AM

सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत

"अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही. पण सुनेत्रा पवार यांना जर भाजपा मुख्यमंत्री करणार असतील, तर तो भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवारांना राजकीय वारसदार बनवून जात असल्याचे या बोलण्यातून दिसते," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

13 Apr, 26 : 11:06 AM

शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? - संजय राऊतांचा सवाल

"शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर कोणीही पवार असतील; तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे उभे आहात," असे विधान उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.

13 Apr, 26 : 10:29 AM

होर्मुझवरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी

अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेले युद्ध काहीकाळ थांबले आहे. युद्धबंदी केल्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात शांतता चर्चा सुरु झाली होती, पण त्या चर्चा निष्फळ ठरल्या. याच पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली न केल्यास अमेरिका इराणी जहाजांची आणि इतर देशांच्या जहाजांची नाकेबंदी करेल, असा इशारा अमेरिकेने इराणला दिला आहे.

13 Apr, 26 : 10:27 AM

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झाल्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली. आज सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी २ वाजेपर्यंत लोअर परळ येथील कासा ग्रँड येथे आशा ताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

13 Apr, 26 : 10:26 AM

सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली

अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १३९९.७७ अंकांनी घसरून ७६,१५०.४८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

13 Apr, 26 : 10:25 AM

आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

आज १३ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर बाजार उघडताच सोन्याच्या भावात १,०४० रुपये आणि चांदीच्या भावात ५,३३९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. 

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 13 April 2026: US Iran war talks highlights, Donald Trump, Israel, Benjamin Netanyahu, Asha Bhosle Funeral, CM Devendra Fadnavis, PM Narendra Modi, Ashok Kharat Crime Case, IPL 2026