Pune Crime: ग्राहकांना शिव्या दिल्यामुळे दारूअड्डा मालकाने केला कामगाराचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 18:24 IST2021-11-21T18:23:50+5:302021-11-21T18:24:19+5:30
दारू अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना शिव्या दिल्यामुळे अड्डामालकाने दारून विकणाऱ्या कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड मारून खून केला

Pune Crime: ग्राहकांना शिव्या दिल्यामुळे दारूअड्डा मालकाने केला कामगाराचा खून
पिंपरी : दारू अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना शिव्या दिल्यामुळे अड्डामालकाने दारून विकणाऱ्या कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड मारून खून केला. ही घटना चिखलीतील भिमशक्तीनगर येथे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मनोहर गलाप्पा डोंगरे (वय ५५, रा. भिमशक्तीनगर, चिखली) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. आशिष गवळी (रा. भिमशक्तीनगर झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल मनोहर डोंगरे (वय २४) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आशिष गवळी याचा भिमशक्तीनगर येथे दारु विक्रीचा धंदा आहे. डोंगरे हे तेथे दारू विक्रीचे काम करतात. डोंगरे यांनी दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांना शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून आरोपी आशिष याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात पाठीमागील बाजुला दगड मारून मनोहर यांचा खून केला असे फिर्यादीत नमूद केले आहे.