वाहन चालकाचा खून करून ईरटीगा कार चोरी; मृतदेह पुणे-नाशिक महामार्वरील आळेखिंडीत फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 10:48 IST2025-01-29T10:47:38+5:302025-01-29T10:48:14+5:30

चालकाचे हात पाठीमागील बाजुन नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टाय (लॉक) याने बांधुन गळा दाबुन खून

Driver murdered, Ertiga stolen; Body thrown into Aalekhindi on Pune-Nashik highway | वाहन चालकाचा खून करून ईरटीगा कार चोरी; मृतदेह पुणे-नाशिक महामार्वरील आळेखिंडीत फेकला

वाहन चालकाचा खून करून ईरटीगा कार चोरी; मृतदेह पुणे-नाशिक महामार्वरील आळेखिंडीत फेकला

आळेफाटा : भाड्याने घेतलेली ईरटीगा कारचोरण्याच्या उद्देशाने चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावरील संतवाडी शिवारातील आळेखिंडीतील वनविभागच्या जंगलात फेकून देण्याची घटना मंगळवारी (२८ जानेवारी) दुपारी उघडकीस आली आहे. राजेश बाबुराव गायकवाड (वय 56 वर्षे) रा. निधी अर्पाजमेंट जेलरोड नाशिक ता. जि. नाशिक असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. चालकाचे हात पाठीमागील बाजुन नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टाय (लॉक) याने बांधुन गळा दाबुन खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर  त्यांच्या टिमने तपास सुरू केला आहे.

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे येथून चालक राजेश गायकवाड मारूती सुझुकी कंपनीची ईरटीगा कार एम एच १५ जेडी ५१९३ या गाडीने पुणे ते सिन्नर एमआयडीसी असे भाडे घेवुन येत असताना मौजे संतवाडी शिवारात ता. जुन्नर जि. पुणे येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चालक गायकवाड यांचा त्यांचे हात पाठीमागील बाजुन नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टाय (लॉक) याने बांधुन ते चालवत असेलेली ईरटीगा चोरी करण्याचे उददेषाने, गळा दाबुन खुन केला. व पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने मृतदेह संतवाडी शिवारात फॉरेस्टचे ओढयात टाकुन दिला अशी फिर्याद मृत चालक गायकवाड यांचा मुलगा अंकुश राजेश गायकवाड याने आळेफाटा पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली आहे.दरम्यान आळेफाटा पोलिसांनी तपास सुरु केला असून गायकवाड यांची कार नेमकी पुणे येथून कोणी भाड्याने घेतली होती याचा तपास सुरु आहे. पोलीस महामार्गावरील सीसीटीव्ही चेक करत आहे

Web Title: Driver murdered, Ertiga stolen; Body thrown into Aalekhindi on Pune-Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.