टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:49 IST2025-07-18T16:49:38+5:302025-07-18T16:49:56+5:30
महामार्गावरील उताराच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळून टेम्पो विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी झाला

टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना
पवनानगर: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर जय मल्हार समोर वळणावर दि.१८ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १४४/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश भाऊसाहेब बुगे (वय.२७, रा. बुगेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे चालकाचे नाव आहे. बुगे चालवत असलेला टेम्पो हा उतारावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळून विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी झाला. अपघात एवढा भीषण होता की, पलटी होणाऱ्या टेम्पोमधून बाहेर उडी मारताना ऋषीकेश टेम्पो खाली सापडून त्याच्या डोक्याला, छातीला, हात-पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पोवार हे करत आहेत.