शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हर अन् कंडक्टर शिवशाहीजवळच; 'गाडेला पकडणार तेवढ्यात... '  तरुणीने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:48 IST

Swargate ST Bus Rape Case: दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा परंतु तोपर्यंत आरोपी दत्तात्रय गाडे तेथून

पुणे -स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पीडित मुलीवरही आरोप होताहेत. तरुणीच्या सहमतीने दोघांमध्ये शरीरसंबंध झाल्याचे आरोपीचा वकील, त्याची पत्नीने म्हटले आहे. तर पैसे न दिल्याने वाद होऊन तरुणीने तक्रार दिल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना पीडित तरुणीने शिवसेनेचे (यूबीटी) राज्य संघटक वसंत मोरे यांना कॉल केला. दोघांमध्ये काय बोलणे झाले, याबद्दल वसंत मोरेंनी माहिती दिली. पुण्यात वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "प्रकरण घडलं, त्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा कॉल आला. ती मुलगी माझ्याशी फोनवर बोलली. ती प्रचंड रडत होती."तरुणीशी फोनवरून बोलणं झालं, त्याच्या एकदिवस आधीच मला असीद सरोदे यांचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं होतं की, या विषयात काही मदत हवी असेल, तर मला सांगा, असे ते म्हणाल्याचेही वसंत मोरे यांनी म्हणाले.  माध्यमांशी वसंत मोरे पुढे म्हणाले,'तिने मला सांगितले, अत्याचार झाला त्यावेळी बस शेजारी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते. त्यावेळी मी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पीडितेने त्यांना आरोपी गाडेची गैरकृत्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा परंतु तोपर्यंत आरोपी दत्तात्रय गाडे तेथून पसार झाला होता, अशी माहिती वसंत मोरे यांना पीडितीने दिली होती.साडेसात हजार घेतल्याचा आरोप"२० मिनिटं मी त्या मुलीशी बोललो. प्रचंड रडत होती. कालपण आम्ही तिच्यासोबत बसलो होतो. ती सुशिक्षित तरुणी आहे. तिच्यावर ज्या पद्धतीने साडेसात हजार घेतल्याचा आरोप होत आहे. आज त्या सगळ्या गोष्टी 'दूध का दूध और पानी का पानी' झाल्या आहे", असे वसंत मोरे बोलताना म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेswargate bus depotस्वारगेट बसस्थानकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMaharashtraमहाराष्ट्रSwargateस्वारगेट