ड्रायव्हर अन् कंडक्टर शिवशाहीजवळच; 'गाडेला पकडणार तेवढ्यात... '  तरुणीने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:48 IST2025-03-05T16:45:31+5:302025-03-05T16:48:54+5:30

Swargate ST Bus Rape Case: दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा परंतु तोपर्यंत आरोपी दत्तात्रय गाडे तेथून

Driver and conductor near Shivshahi Just as we were about to catch the train young woman tells her story | ड्रायव्हर अन् कंडक्टर शिवशाहीजवळच; 'गाडेला पकडणार तेवढ्यात... '  तरुणीने सांगितली आपबीती

ड्रायव्हर अन् कंडक्टर शिवशाहीजवळच; 'गाडेला पकडणार तेवढ्यात... '  तरुणीने सांगितली आपबीती

पुणे -स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पीडित मुलीवरही आरोप होताहेत. तरुणीच्या सहमतीने दोघांमध्ये शरीरसंबंध झाल्याचे आरोपीचा वकील, त्याची पत्नीने म्हटले आहे. तर पैसे न दिल्याने वाद होऊन तरुणीने तक्रार दिल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना पीडित तरुणीने शिवसेनेचे (यूबीटी) राज्य संघटक वसंत मोरे यांना कॉल केला. दोघांमध्ये काय बोलणे झाले, याबद्दल वसंत मोरेंनी माहिती दिली.
 
पुण्यात वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "प्रकरण घडलं, त्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा कॉल आला. ती मुलगी माझ्याशी फोनवर बोलली. ती प्रचंड रडत होती."

तरुणीशी फोनवरून बोलणं झालं, त्याच्या एकदिवस आधीच मला असीद सरोदे यांचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं होतं की, या विषयात काही मदत हवी असेल, तर मला सांगा, असे ते म्हणाल्याचेही वसंत मोरे यांनी म्हणाले.  माध्यमांशी वसंत मोरे पुढे म्हणाले,'तिने मला सांगितले, अत्याचार झाला त्यावेळी बस शेजारी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते. त्यावेळी मी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पीडितेने त्यांना आरोपी गाडेची गैरकृत्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले सुद्धा परंतु तोपर्यंत आरोपी दत्तात्रय गाडे तेथून पसार झाला होता, अशी माहिती वसंत मोरे यांना पीडितीने दिली होती.

साडेसात हजार घेतल्याचा आरोप

"२० मिनिटं मी त्या मुलीशी बोललो. प्रचंड रडत होती. कालपण आम्ही तिच्यासोबत बसलो होतो. ती सुशिक्षित तरुणी आहे. तिच्यावर ज्या पद्धतीने साडेसात हजार घेतल्याचा आरोप होत आहे. आज त्या सगळ्या गोष्टी 'दूध का दूध और पानी का पानी' झाल्या आहे", असे वसंत मोरे बोलताना म्हणाले.

Web Title: Driver and conductor near Shivshahi Just as we were about to catch the train young woman tells her story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.