शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या आशीर्वादाने चालकांची मुजोरी

By admin | Updated: July 18, 2014 03:34 IST

वाहतूक नियमाकडे डोळेझाक करीत बिनधास्तपणे रिक्षा चालविणे हा आपला अधिकार असल्याचा आविर्भावात चालक शहरात सर्वत्र दिसतात

मिलिंद कांबळे, पिंपरीवाहतूक नियमाकडे डोळेझाक करीत बिनधास्तपणे रिक्षा चालविणे हा आपला अधिकार असल्याचा आविर्भावात चालक शहरात सर्वत्र दिसतात. आपल्यासाठी कोणतेच नियम नाहीत, अशा आविर्भावात ते वाहन चालवितात. मात्र, रिक्षाला इतर वाहनांचा थोडासा जरी स्पर्श झाला, तर त्या चालकांच्या अंगावर धावून जातात. नियमाकडे दुर्लक्ष करीत बेधडक रिक्षा चालवून वाहन चालविण्याची वेगळीच क्रेझ दिसते. नियम मोडले तरी, वाहतूक पोलीस त्याच्याकडे कानाडोळा करतात. इतर वाहनचालकावर शिस्तीचा बडगा उगारणारे पोलीस रिक्षावाल्याना का पाठीशी घालतात, हे मोठे आश्चर्य आहे. बॅच, परवाना, तसेच परमिट नसलेल्या अनेक रिक्षा बिनदिक्कतपणे शहरात धावतात. पोलीस मात्र, असा रिक्षांकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करतात. स्थानिक नेते व गुंडांची ही वाहने आहेत. पोलिसांनी अशा रिक्षा पकडल्या, तरी त्या आरटीओपर्यंत जात नाहीत.तेथेच दंड करुन त्या सोडून दिल्या जातात. मात्र, सामान्य रिक्षाचालकावर कोर्ट, आरटीओ, वाहतूक पोलीस असा तिन्ही प्रकाराचा दंड आकारुन रिक्षा ८ ते १० दिवसांसाठी सस्पेंड केली जाते. कोर्टातून वाहन सोडविताना किमान १,८०० रु. दंड भरावा लागतो. वकिलाचे शुल्क असे दोन ते सव्वादोन हजार रुपये खर्च होतो. रिक्षा बंद असल्याने त्या दिवसांचा धंदा बुडतो. ही रकम भरण्यास पुन्हा सावकारी कर्जाच्या कचाट्यात तो सापडतो. एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की, भरधाव रिक्षा कोठेही थांबविली जाते. मागून येणाऱ्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होतो. नियंत्रण मिळविताना दुभाजकावर जाऊन वाहन धडकते. यावरुन वाद घातल्यास रिक्षाचालक त्या व्यक्तीलाच शिवीगाळ करतात.