'मुलीला त्रास देऊ नको', मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा राग, बॅटने मारहाण करून खून, धायरीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:55 IST2026-03-13T11:54:45+5:302026-03-13T11:55:17+5:30

टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने त्याच्या नात्यातील एका मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला होता

'Don't bother the girl', anger of the young man who intervened, beating to death with a bat, shocking incident in Dhaari | 'मुलीला त्रास देऊ नको', मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा राग, बॅटने मारहाण करून खून, धायरीतील धक्कादायक घटना

'मुलीला त्रास देऊ नको', मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा राग, बॅटने मारहाण करून खून, धायरीतील धक्कादायक घटना

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे एका तरुणाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेमसंबंधाच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ११ मार्च २०२६ रोजी रात्री धायरीतील डीएसके रस्त्यावर घडली. विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. राधिका रॉयल सोसायटी, बारंगणी मळा, धायरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत आदित्य उमाप (रा. पुणे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे.

विशाल हा टेलरिंगचा व्यवसाय करत होता. त्याने नात्यातील एका मुलीला त्रास देणाऱ्या आदित्यला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मुलीला त्रास देऊ नको, असे म्हणत त्याने मध्यस्थी केली होती. मात्र, या गोष्टीचा राग मनात धरून आदित्यने विशालवर जीवघेणा हल्ला केला. दळवीवाडी फाट्याजवळील गाईच्या गोठ्यासमोर हा हल्ला झाला. आरोपीने विशालवर लाकडी बॅटने गंभीर मारहाण करून खून केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करत आहेत. 

Web Title : छेड़छाड़ मामले में हस्तक्षेप करने पर पुणे में युवक की हत्या।

Web Summary : पुणे के धायरी में, एक दर्जी, विशाल हबीब की एक लड़की के उत्पीड़न को रोकने के लिए मध्यस्थता करने के बाद हत्या कर दी गई। विशाल के हस्तक्षेप से नाराज आदित्य उमाप ने उस पर लकड़ी के बल्ले से जानलेवा हमला किया। पुलिस जांच कर रही है; संदिग्ध फरार है।

Web Title : Pune Youth Killed for Intervening in Harassment Case.

Web Summary : In Dhayari, Pune, a tailor, Vishal Habib, was murdered after mediating to stop the harassment of a girl. Aditya Umap, the suspect, angered by Vishal's intervention, fatally attacked him with a wooden bat. Police are investigating; the suspect is at large.