शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘वडाच्या फांद्यांची पूजा नको’

By admin | Updated: June 9, 2014 05:22 IST

वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा न करता झाडाची पूजा करावी. अगदीच अशक्य असेल, तर प्रतीकात्मक स्वरूपात वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करावी,

पिंपरी : वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा न करता झाडाची पूजा करावी. अगदीच अशक्य असेल, तर प्रतीकात्मक स्वरूपात वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करावी, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने केले आहे.भारतीय स्त्रीच्या जीवनात वटवृक्षाला विशेष महत्त्व आहे. चिरंतन सौभाग्यासाठी भारतीय स्त्रिया वडाची पूजा करतात. पुराणकाळात सावित्री वटवृक्षाचे माहात्म्य जाणत होती. म्हणूनच तिने मूर्च्छा आलेल्या सत्यवानाला वटवृक्षाखाली झोपवले. कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळजवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. मृतवत पतीला प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती, हे तिला माहिती होते. आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो.भारतीय जीवनशैलीत सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा जितका समतोल राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कोठेही सांभाळला गेला नसेल. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा उदात्त वारसा असलेल्या देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. वटपौर्णिमा हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे.हा सण भारतीय स्त्रियासाठी जरी जिव्हाळ्याचा असला, तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरणप्रेमींना पौर्णिमेनंतर रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहावे लागते, असे सचिव भास्कर रिकामे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)