आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी पूर्ण, केसांचे नमुने घेतले; लवकरच अहवाल मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:50 IST2025-03-03T12:49:00+5:302025-03-03T12:50:04+5:30
Pune Crime News : स्वारगेट येथील २६ वर्षीय तरणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीची डीएनए चाचणी केली आहे.

आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी पूर्ण, केसांचे नमुने घेतले; लवकरच अहवाल मिळणार
किरण शिंदे
Pune Crime News ( Marathi News ) : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक येथे दोन दिवसापूर्वी एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांना अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू आहे, आरोपीला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीची डीएनए चाचणी करण्यात आली असून बसमधील केसांचे नमुने गोळा करण्यात आले होते. दरम्यान, आता काही वेळातच डीएनएचे रिपोर्ट समोर येणार आहेत.
हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?
लवकरच पोलिसांना डीएनए चाचणीचा अहवाल मिळणार आहे. एसटी बसमध्ये आरोपी दत्ता गाडे याचे केस सापडले आहेत. केसांचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले असून डीएनए चाचणी करण्यात आली आहे. चाचणी पूर्ण झाली असून आता अहवाल मिळणार आहे. या अहवालामधून पोलिसांना आरोपीविरोधात भक्कम पुरावा मिळणार आहे.
२५ फेब्रुवारी रोजी सकाळी पुण्यातील स्वारगेट एस टी स्थानकात बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. ज्या एस टी बसमध्ये हे कृत्य घडले त्या बस ची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान एस टी बसमध्ये काही केस आढळून आले आहेत. या केसांच्या सोबत आरोपी दत्ता गाडे याच्या केसांच्या सॅम्पलिंग डीएनए मॅचिंग झाल्याचे बोलले जात आहे.
स्वारगेट प्रकरण: ‘ती’ मेल्यागत पडून राहिली
पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून आरोपी तिला घेऊन गेला. ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने आपल्याल जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती.
आरोपीच्या खात्यात महिनाभरापासून २४९ रुपये
स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचेदेखील सांगितले गेले. तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.