शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहराला बकालपणा

By admin | Updated: August 4, 2014 04:17 IST

भोर शहरातील नव्यानेच केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे सर्वच रोडला खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे

भोर : तुंबलेली गटारे, जागोजागी पडलेला कचरा, वाढलेली झाडेझुडपे, खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळणी, अस्ताव्यस्त कचराकुंड्या, सर्वत्र दुर्गंधी, गढूळ व अपुरा पाणीपुरवठा, पद असलेले पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, रोजच होणारी वाहतूककोंडी, यामुळे भोर शहराला बकालपणा आला असून, या बाबत मात्र नगरपरिषद उदासीन आहे. या बाबत तक्रारी करूनही नारिकांच्या पदरी निराशाच पडते. भोर शहरातील नव्यानेच केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे सर्वच रोडला खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणेही नागरिकांना अवघड झाले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हे कळत नाही. यामुळे येथे अपघात होत आहेत. भर पावसाळ्यात पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय. शहरातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद आहेत. रात्री-अपरात्री लोकांना वावरताना त्रास होतो. चोऱ्या वाढल्या आहेत, शहरातील सार्वजनिक मुताऱ्या व शौचालये यांची साफसफाई वेळेवर होत नाही तसेच तेथे पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. त्याची दुरवस्था झाली आहे. शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, भोर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे पूर्ण नाही दुर्लक्ष होत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा वाद शेवटपर्यंत सुरूच आहे. त्यांच्या वादामुळे नागरिकांना मात्र समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. विरोधी नगरसेवक मूगगिळून गप्प आहेत, त्यामुळे भोर नगरपालिकेची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीपेक्षा वाईट झाली आहे. शहरातील वाढती अतिक्रमणांमुळे वाहतुकीच्या समस्यांचा बोजवारा उडाला आहे. नवीन तयार केलेली बाग एक दिवस सुरू झाली व वादामुळे पुन्हा बंद झाली, ती आता शोभेची वस्तू झाली आहे. भोर समस्यांचे शहर बनले आहे.