एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; ६ हजार रुपये बोनस मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:33 IST2025-10-14T11:31:23+5:302025-10-14T11:33:36+5:30

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे - एकनाथ शिंदे

Diwali will be sweet for ST employees; They will get a bonus of Rs 6,000, says Eknath Shinde | एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; ६ हजार रुपये बोनस मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; ६ हजार रुपये बोनस मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती

पुणे : एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. यासह पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. या बैठकीस परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून, यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनादेखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे. - प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

Web Title : एसटी कर्मचारियों की दिवाली मीठी: एकनाथ शिंदे द्वारा ₹6,000 बोनस की घोषणा

Web Summary : एसटी कर्मचारियों को ₹6,000 दिवाली बोनस मिलेगा, एकनाथ शिंदे ने घोषणा की। सरकार वेतन वृद्धि के लिए ₹65 करोड़ मासिक प्रदान करेगी। योग्य कर्मचारी दिवाली अग्रिम के रूप में ₹12,500 भी प्राप्त कर सकते हैं। सरकार एसटी का आर्थिक रूप से समर्थन करती है और पीपीपी के माध्यम से एसटी भूमि का विकास करेगी।

Web Title : ST Workers' Diwali Sweetened: ₹6,000 Bonus Announced by Eknath Shinde

Web Summary : ST workers will receive a ₹6,000 Diwali bonus, announced Eknath Shinde. The government will provide ₹65 crore monthly for salary increases. Eligible employees can also get ₹12,500 as a Diwali advance. The government supports ST financially and will develop ST land through PPP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.