शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

हरिनामाच्या गजरात दिवे घाट सर..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 9:03 PM

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘एवढा करा उपकार!  देवा सांगा नमस्कार...’असे म्हणत शहरातील भक्तांनी निरोप दिला.

ठळक मुद्दे.पुण्यातून बरसत्या सरींमध्ये पालखीला निरोप  सासवडला सोहळा मुक्कामपुण्यातील विश्रांतीनंतर शुक्रवारी पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा

सासवड : हरिओम विठ्ठला, ज्ञानोबा-माऊली तुकाराम, पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली, माऊली अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलया पार केला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘एवढा करा उपकार!  देवा सांगा नमस्कार...’असे म्हणत शहरातील भक्तांनी निरोप दिला. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झेंडेवाडी येथे दाखल झाला.दिवे घाटातील सह्याद्रीच्या कडा झालेल्या पावसामुळे हिरवाईने नटलेल्या होत्या. त्यामुळे वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येथे आली. अवघड असा दिवे घाट टाळ मृदुगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात लिलया पार करण्यात आला. दरम्यान, पुण्यातील विश्रांतीनंतर शुक्रवारी पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा होता. पण सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढही होती. महापूजा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनंतर सकाळी साडेसहा वाजताच पालखीने सासवडच्या दिशेने मार्गस्थ केले. दुपारी वडकी येथे माऊलींना पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला.  हडपसर येथे सकाळी विसावा घेतल्यानंतर दिवे घाटाची अवघड चढण सुरू झाली. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा  याचि देही याचि डोळा  अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले. पुण्यातील भक्तीसंगमानंतर संतश्रेष्ठ तुकोबाराय व ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळा सकाळी पुण्यनगरीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला.  ज्ञानोबा माऊलींची पालखी शुक्रवारी संत सोपानकाकांच्या नगरीत मुक्कामाला विसावली. ......संत ज्ञानेश्वर यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांची समाधी सासवड येथे असून रविवारी सोपानदेव यांची पालखी दुपारी साडेबारा वाजता पंढरपुरकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान माऊलींची पालखी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आज कºहा काठी विसावली. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला, राजे उमाजी नाईक यांचे जन्म गाव भिवडी, महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी येथे जवळच आहे. नारायणपुर, भुलेश्वर, कानिफनाथ या तीर्थ क्षेत्रामुळे या भागात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

टॅग्स :Purandarपुरंदरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी