शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पुणे जिल्ह्यातील फोफावलेल्या वाळू माफियांना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नवे अस्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 21:00 IST

गेल्या दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे...

ठळक मुद्देपुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णयवाळू माफियांना रोखण्यासाठी महसूल, पोलीस, आरटीओसह वन विभाग एकत्र टास्क फोर्स स्थापन

पुणे : गेल्या दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. हे रोखण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई सुरू आहेत. परंतु याला मर्यादा येतात. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील वाळू माफियांना रोखण्यासाठी महसूल, पोलीस, आरटीओसह वन विभाग एकत्र टास्क फोर्स स्थापन करून पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.         कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बहुतेक सर्व महसूल यंत्रणा त्याच कामामध्ये व्यस्त आहे. याच संधीचा फायदा घेऊन जिल्ह्यातील वाळू माफीयांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात वाळू उपसा आणि वाहतुकीला बंदी असताना सध्या सरसकट मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. या वाळू माफीयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. परंतु महसुल विभागाच्या या पथकाला अनेक मर्यादा येतात. तसेच पुणे जिल्ह्यात कारवाई केल्यानंतर हे वाळू माफीया लगतच्या जिल्ह्यात म्हणजे नगर, सोलापूर मध्ये पळ काढतात. याच पार्श्वभूमीवर डाॅ.राजेश देशमुख यांनी सर्व संबंधित विभाग व त्यांचे प्रमुख अधिकारी यांची बैठक घेऊन एॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यात एकाच वेळेस नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात संयुक्त कारवाई करणे, वाळू माफीयांच्या उत्खननासाठी वापरण्यात येणा-या बोटी उध्वस्त करण्यासाठी गॅस कट्टर खरेदी करणे, जप्त केलेल्या वाळू लिलाव करून सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा अन्य सरकारी यंत्रणेला वापरण्यासाठी देणे आदी विविध नियोजन करण्यात आले आहे.         जिल्ह्यात पर्यावरण समितीने गेल्या काही वर्षांपासून वाळू उपशाला बंदी घातली आहे. यामुळेच गेल्या दोन - तीन वर्षांपासून जिल्ह्यात वाळू उपशासाठीचे लिलावच झाले नाहीत. परंतु जिल्ह्यात वाळू उपशाचे लिलाव झाले नसले तरी बांधकामे व इतर विकास कामे सुरू आहेत. यामध्ये गेल्या काही वर्षांत बांधकामासाठी क्रश सॅन्ड चा वापर केला जातो. तरी देखील पारंपारीक पध्दतीने वाळूची मागणी कायम असून,  किंमतही चांगली मिळते. यामुळेच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीsandवाळूCrime Newsगुन्हेगारी