शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

हॉस्पिटलची तोडफोड

By admin | Updated: May 6, 2017 02:27 IST

अ‍ॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : अ‍ॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन कक्षाची ताडफोड करीत गोंधळ घातला. गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी सचिन हडप (वय २२, रा. खोपोली, जि. रायगड) या महिलेला बुधवारी सकाळी अ‍ॅपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेसाठी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सातला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर महिलेची प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचारही सुरू केले. मात्र, अखेर दुपारी चारच्या सुमारास उपचारादरम्यान माधुरी हडप यांचा मृत्यू झाला. माधुरी यांच्या या अचानक मृत्यूमुळे संतप्त झालेल्या तिच्या नातेवाइकांनी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत रिसेप्शन कक्षाची तोडफोड केली. या घटनेची खबर प्राप्त होताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. माधुरी यांना तीन वर्षांचा मुलगा असून अ‍ॅपेंडिक्सचा किरकोळ त्रास असणाऱ्या माधुरी यांची तब्येत तंदुरुस्त होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा केवळ डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करीत माधुरी यांच्या नातेवाइकांनी करीत दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. लोणावळा पोलिसांनी माधुरी यांचा आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून, त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तपासाची दिशा ठरणार आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण करीत आहेत.