शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

भोर एसटीस्थानकावर संतप्त जमावाकडून तोडफोड

By admin | Updated: September 23, 2014 06:42 IST

स्टँडची सुरक्षा रामभरोसे भोर एसटी स्टँडवर दररोज ३ ते ४ हजार विद्यार्थी प्रवास करतात. या शिवाय इतर प्रवास कसणारे हजारो प्रवासी आहेत.

भोर - स्टँडची सुरक्षा रामभरोसे भोर एसटी स्टँडवर दररोज ३ ते ४ हजार विद्यार्थी प्रवास करतात. या शिवाय इतर प्रवास कसणारे हजारो प्रवासी आहेत. यामुळे दररोज दुपारी ११ ते २ वाजपर्यंत येथे मोठी गर्दी असते. या वेळी मुलींसह अबालवृद्धांना गाडीत चढता येत नाही. धक्काबुक्की होते. अनेक मुले एसटीत चढताना खिडकीतून प्रवेश करतात. यातून लहान-मोठे अपघात होतात. वादावादीही होते. मात्र, एसटी स्टँडवर वाहतूक नियंत्रक नाही, शिवाय अनेकदा मागणी करूनही वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात नसल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्टँडवर दुचाकी, चारचाकी वाहनेही लावली जातात. यामुळेही वाहतुकीचा खोळंबा होतो याकडेही आगाराचे दुर्लक्ष आहे, यातूनच असे अपघात घडतात. भोर : स्वारगेट- भोर एसटी बसखाली सापडून एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने येथील एका मिनीबसची व कंट्रालरूमची तोडफोड केली. सदर महिलेचा मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने भोर एसटी स्टँडवर तणाव निर्माण झाला होता. एसटी बसेस रोखून धरल्याने सुमारे तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.लीलाबाई बाळू गोळे (६६, रा. पोम्बर्डी, ता. भोर) असे या मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११.४५ वा घडली. चालकाला अटक करण्यात आली आहे.एमएच १२, सी.एच. ७0१४ ही स्वारगेट-भोर एसटी बस भोर स्टँडवर प्रवाशी उतरवून महुडे गावाला जात होती. त्या वेळी लीलाबाई गोळे या महिलेला बसने उडवले. त्यात ती उजव्या बाजूच्या पुढच्या व मागच्या दोन्ही चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. त्यानंतर एसटी आगाराकडून उशिराने कारवाई झाल्याने येथील जमाव संतप्त झाला. सदर महिलेचा मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र, आगारप्रमुखांनी लेखी दिल्यावर तणाव शांत झाला. भोर पोलिसांनी एसटी चालक बबन दगडू बदक (रा. बारे खुर्द) याला अटक केली आहे. सदरच्या महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होती. आज दुपारी ही महिला आपल्या मुलीकडे केंजळ गावाला जाण्यासाठी आली होती. त्याच वेळी ही घटना घडली. दरम्यान, महामंडळाकडून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख भोंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)