Pune: २ मित्रांमध्ये वाद; तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून, जांभूळवाडी तलाव बांधावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:42 IST2025-06-16T15:41:52+5:302025-06-16T15:42:20+5:30

आंबेगाव परिसरात जांभूळवाडी तलाव परिसरात दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातला

Dispute between 2 friends Youth killed by throwing stone at his head incident at Jambhulawadi Lake Dam | Pune: २ मित्रांमध्ये वाद; तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून, जांभूळवाडी तलाव बांधावरील घटना

Pune: २ मित्रांमध्ये वाद; तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून, जांभूळवाडी तलाव बांधावरील घटना

पुणे : वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना आंबेगाव मधील जांभूळवाडी तलावाच्या बांधावर घडली. याप्रकरणी आंबेगावपोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित नामदेव ढमाळ (रा. योगमुद्रा बिल्डींग, भूमकर वस्ती, नऱ्हे, सिंहगड रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सूरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (२१, रा. प्रतीक हाईट्स, पारी कंपनीजवळ, नऱ्हे, सिंहगड रस्ता) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज आणि रोहित हे मित्र आहेत. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता शनिवारी (दि. १४) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव परिसरात जांभूळवाडी तलाव परिसरात सूरज, रोहित यांच्यात वाद झाला. वादातून सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या सूर्यवंशीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक गोरे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Dispute between 2 friends Youth killed by throwing stone at his head incident at Jambhulawadi Lake Dam