शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आकडा टाकून वीजचोरी

By admin | Updated: February 23, 2015 00:46 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी विभागात वेगवेगळ्या कारणास्तव सात टक्के वीजगळती होत आहे. आकडा टाकून वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.

मंगेश पांडे,पिंपरीपिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी विभागात वेगवेगळ्या कारणास्तव सात टक्के वीजगळती होत आहे. आकडा टाकून वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात घरगुती वीज ग्राहकांसोबतच उद्योगांना दररोज ५६० मेगावॉट विजेचा पुरवठा केला जातो. औद्योगिकनगरीत सात हजारांहून अधिक उद्योग आहेत. महावितरणचे पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी आणि भोसरी असे दोन विभाग आहेत. या विभागांमध्ये चिंचवड, सांगवी, खराळवाडी, भोसरी विभागात निगडी प्राधिकरण, आकुर्डी या उपविभागांचा समावेश आहे. पिंपरी विभागात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर २ लाख ८६ हजार, तर भोसरी विभागात १ लाख ९८ हजार वीजजोड आहेत. पिंपरी विभागात वीजजोड अधिक असतानाही २६० मेगावॉट विजेची आवश्यकता भासते, तर भोसरीत १ लाख ९८ हजार वीजजोड असतानाही पिंपरीच्या तुलनेत भोसरीला ४० मेगावॉट वीज जास्तीची म्हणजेच एकूण ३०० मेगावॉट विजेची गरज लागत आहे.वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीजचोरीचे प्रमाण झोपडपट्टी भागात जास्त आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ही वीजचोरी होते. पिंपरीतील रिव्हर रोड, रमाबाईनगर, तसेच तळवडेतील सहयोगनगर, त्रिवेणीनगर या भागांत आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तारा तुटलेल्या अवस्थेत असतात. यातूनही विजेची गळती होते. अशा प्रकारे वीजगळती होत असल्याने नुकसान होत आहे.