दीनानाथ रुग्णालय प्रकरण चिघळले; हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:12 IST2025-04-04T21:01:01+5:302025-04-04T21:12:18+5:30

खासगी रुग्णालयात भाजप महिला आघाडीकडून तोडफोड करण्यात आली होती

Dinanath Hospital case escalates; Case registered against female protesters for vandalizing hospital | दीनानाथ रुग्णालय प्रकरण चिघळले; हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल

दीनानाथ रुग्णालय प्रकरण चिघळले; हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल

-किरण शिंदे

पुणे -
 शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेकडून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

रुग्णालयाने १० लाख मागितले होते का? याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. योग्य माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटना, पक्ष एकत्र येत आंदोलन करण्यात आली. हॉस्पिटलची जागा त्यांच्या ताब्यातून काढून घ्यावी. अधिकाऱ्यांना निलंबित करावे, रुग्णालय प्रशासनावर कठोर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पतित पावन संघटनकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नावावर काळ फासलं गेलं आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यावर लोकांनी चिल्लर पैसे फेकले होते.



तर पुण्याच्या डॉ घैसास यांच्या खासगी रुग्णालयात भाजप महिला आघाडीकडून तोडफोड करण्यात आली होती. दीनानाथ हॉस्पिटल घटनेत महिलेला उपचाराबाबत खर्च सांगणारे हेच घैसास डॉक्टर आहेत. त्याठिकाणी जाब विचारण्यासाठी भाजप महिला आघाडीच्या महिला गेल्या असता त्यांनी तोडफोड केली होती. या आंदोलनावेळी नवसह्याद्री सोसायटीमधील नर्सिंग हॉस्पिटलची महिला आंदोलकांच्या गटाने तोडफोड केली होती. अशात भाजप महिला पदाधिकाऱ्यांना आंदोलन भोवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगलीच्या आरोपाखाली आणि महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स (हिंसाचार प्रतिबंधक आणि मालमत्तेचे नुकसान किंवा नुकसान) कायदा, २०१० च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आज डॉक्टर घैसास यांच्या खाजगी रुग्णालय/ दवाखान्याची तोडफोड केली होती याप्रकरणी आता भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दीनानाथ रुग्णालयात डॉ सुश्रुत घैसास यांनी भिसे प्रकरणात उपचारासाठी डिपॉझिट म्हणून १० लाख रुपयांची मागणी केली होती याचा निषेध म्हणून भाजप महिला कार्यकर्त्यांनी आज डॉ घैसास कुटुंबियांकडून सुरू असलेल्या पुण्यातील रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली.  

Web Title: Dinanath Hospital case escalates; Case registered against female protesters for vandalizing hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.