शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी डिजिटल रथाला प्राधान्य]

By admin | Updated: February 18, 2017 03:58 IST

कमी कालावधीमुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड असल्याने बहुसंख्य माननीयांनी आपण केलेल्या कामाची माहिती सर्वांपर्यंत

पुणे : कमी कालावधीमुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड असल्याने बहुसंख्य माननीयांनी आपण केलेल्या कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल रथाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे़ प्रत्येक प्रभागातील चारही उमेदवार एकत्रितपणे पदयात्रा करून मतदारांशी संपर्क साधत आहेत़ एकत्रित प्रचार केल्याने जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्यास त्यांना मर्यादा येऊ लागल्या आहेत़ त्यामुळे अपक्षांसह सर्वच उमेदवारांनी रिक्षांद्वारे प्रचार करण्यास सुरुवात केली आहे़ त्याचबरोबर नगरसेवकांनी आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल रथाचा आधार घेतला आहे़ छोट्या टेम्पोच्या एका बाजूला  मोठा स्क्रीन लावला जातो़ त्यावर  त्या उमेदवाराची तयार केलेली  फिल्म दाखविली जात आहे़ चौकाचौकांत, गल्लीतील एका कोपऱ्यात हा टेम्पो उभा केला जातो़ टेम्पो चालकाला ही फिल्म कशी सुरू करायची, याची माहिती दिलेली असते़ टेम्पो थांबवून तो ही फिल्म सुरू करतो़ अनेक नगरसेवकांनी आपली स्वत:ची फिल्म केली असली तरी चारचा प्रभाग असल्याने प्रभागातील पक्षाच्या इतर तीन उमेदवारांनाही त्यात स्थान दिलेले दिसते़ काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रामुख्याने सोनिया गांधी, राजीव गांधी, राहुल गांधींच्या छायाचित्रांबरोबरच काँग्रेस सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली आहे़ त्याबरोबरच प्रत्येकाने आपण कोणकोणती कामे पुणे शहरात केली़ काँग्रेसने शहरात केलेली कामे यांची माहिती दिली आहे़ भाजपाच्या उमेदवारांचा सर्व भर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिसून आला आहे़ अनेकांच्या फिल्मची सुरुवातच नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होताना दिसत आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा भर हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दिसून आला़ राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत केलेल्या विविध कामांचे व्हिडीओ तसेच या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात केलेल्या कामांचा चित्रफिती दिसून येतात़ त्यानंतर त्या त्या पक्षाच्या अजेंडामध्ये असलेल्या काही योजनांचा उल्लेख दिसतो़ त्यानंतर या उमेदवारांचे छोटेखानी निवेदन व आपल्यालाच निवडून देण्याचे आवाहन केलेले असते़ साधारण १० ते १२ मिनिटांची  ही फिल्म पाहण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसते़  साधारण एकाच ठिकाणी काही  वेळा दोनदा ही फिल्म दाखविली जाते़ त्यानंतर डिजिटल रथ पुढच्या ठिकाणी रवाना होतो़ साधारण सकाळपासून सुरू होणाऱ्या या डिजिटल प्रचारात एका दिवसात २० ते २५ ठिकाणी ही फिल्म दाखविली जात असल्याने अन्य माध्यमांपेक्षा याद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवार यशस्वी होताना दिसत आहेत़ शहरातील अनेक प्रभागांची सीमारेषा कागदावर असली तरी प्रत्यक्षात टेम्पोचालकाला अनेकदा ती लक्षात येतेच असे नाही़ त्याशिवाय एका रस्त्याच्या उजव्या बाजूला एक प्रभाग तर, डाव्या बाजूला दुसरा प्रभाग अशी स्थिती दिसून येते़ त्यामुळे अशा रस्त्यावर गर्दी व पार्किंगमुळे जागा मिळाली नाही, तर टेम्पोचालक जागा शोधत पुढे निघतो आणि दुसऱ्या प्रभागात जाऊन ही फिल्म दाखविताना दिसून आले आहे़