शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्पीडोमीटर बंद पाडून होतेय डिझेलचोरी

By admin | Updated: August 3, 2015 04:13 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) ९५ टक्के बसचे स्पीडोमीटर बंद असल्याची धक्कादायक माहिती पीएमपी प्रशासनाकडून

दीपक जाधव , पुणेपुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) ९५ टक्के बसचे स्पीडोमीटर बंद असल्याची धक्कादायक माहिती पीएमपी प्रशासनाकडून माहिती अधिकारामध्ये अधिकृतरीत्या देण्यात आली आहे. डिझेलचोरीसाठी हे स्पीडोमीटर बंद पाडले जात असून, अगदी नव्याने खरेदी केलेल्या बसचेही स्पीडोमीटर बंद स्थितीत असल्याचे उजेडात आले आहे.शहरामध्ये पीएमपीच्या मालकीच्या १२०६ बस आहेत, त्यापैकी ११०० बसचे स्पीडोमीटर बंद स्थितीत आहे. गाडी किती किलोमीटर धावली, अ‍ॅव्हरेज किती मिळतो आहे, गाडीचा वेग किती आहे, हे समजण्यासाठी स्पीडोमीटरचा उपयोग होतो. मात्र, पीएमपीच्या जवळजवळ सर्वच बसचे स्पीडोमीटर बंद असल्यामुळे याची कोणतीही नोंद पीएमपीकडे नाही. पीएमपीच्या बस दररोज किती किलोमीटर धावतात, याची माहितीच मिळत नसल्याने त्यांना किती डिझेल लागले, त्याचा अ‍ॅव्हरेज किती मिळाला, याची नोंदच ठेवता येत नाही. त्यामुळे डिझेलचोरीला मोकळे रान मिळत आहे. जुन्यासह नवीन बसचेही स्पीडोमीटर बंद असल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पीएमपीच्या बसला प्रतिलिटर ३.७५ अ‍ॅव्हरेज मिळणे अपेक्षित आहे, त्याप्रमाणे बसना अ‍ॅव्हरेज मिळतो का, याची योग्य व खरी माहितीच पीएमपीकडे नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांना मिळालेल्या माहितीतून हा प्रकार उजेडात आला आहे.