टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:49 IST2023-09-07T11:49:09+5:302023-09-07T11:49:56+5:30

दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घसरून पडला, आणि मागून येणाऱ्या टेम्पोखाली आला

Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway | टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती(ता. हवेली ) हद्दीतील हाॅटेल मनाली जवळ अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराचा पाठीमागून येणाऱ्या टेम्पोच्या खाली येऊन जागीच मृत्यू व एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी(दि.०७) पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मुन्ना मोमीन शेख असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून आशिष रामदास जवरे (रा.शेवगाव, जिल्हा अहमदनगर )हा जखमी झाला आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास थोडा रिमझिम पाऊस पडल्याने पुणे सोलापूर महामार्गावर पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर एका दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व घसरून पडल्याने पाठीमागून येत असलेल्या अवजड वाहनाखाली येऊन चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक जखमी झाला असून त्याला लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताची खबर मिळताच कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार उमेश ढाकणे, विजय काणेकर व लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे बालाजी बांगर हे घटनास्थळी पोहोचले त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमीला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

माजी सरपंच सचिन तुपे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात. आत्तापर्यंत पुणे सोलापूर महामार्गावर बहुतांश अपघातस्थळी जाऊन मदत केली आहे. आजही पहाटे व्यायामासाठी बाहेर पडले असता या अपघाताची खबर मिळाली ते अपघातस्थळी धावले आणि अपघातग्रस्त नागरिकाला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway