पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केली? आरोपीच्या वकिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:16 IST2025-07-16T11:16:21+5:302025-07-16T11:16:54+5:30

पुणे -  मुळशी तालुक्यातील जंगलात शस्त्रांचा वापर करून गोळीबाराचा सराव केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गणेश मोहिते या आरोपीने ...

Did Paud police mislead the court? Serious allegations by the accused's lawyers | पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केली? आरोपीच्या वकिलांचा गंभीर आरोप

पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केली? आरोपीच्या वकिलांचा गंभीर आरोप

पुणे -  मुळशी तालुक्यातील जंगलात शस्त्रांचा वापर करून गोळीबाराचा सराव केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गणेश मोहिते या आरोपीने पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून, न्यायालयात मारहाणीबाबत तक्रार दाखल केली आहे. यावर न्यायालयाने १४ जुलै रोजी पोलिस प्रशासनास नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?

८ जुलै रोजी गणेश मोहिते याला येरवडा कारागृहातून अटक करण्यात आली. आरोप होता की, मुळशीच्या जंगलात ७-८ पिस्तुलांचा वापर करून गोळीबाराची चाचणी करण्यात आली. या कारवाईसाठी व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंगचा आधार घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

मात्र, बचाव पक्षाचे म्हणणे आहे की, सासवड पोलिस ठाण्यात यापूर्वीच जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्हा दाखल असून त्याच प्रकरणातील आरोप पुन्हा नव्याने नोंदवत, पौड पोलिसांनी शस्त्र कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला. यामुळे एकाच प्रकरणावर आधारित दोन गुन्हे दोन ठिकाणी दाखल करण्यात आले, असा आरोप करण्यात आला.

वकिलांचे आरोप

बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रसन्नकुमार जोशी, ॲड. प्रथमेश गांधी आणि ॲड. साक्षी कुसाळकर यांनी न्यायालयात यासंदर्भात अर्ज दाखल करत, खालील मुद्दे उपस्थित केले:

न्यायालयास दिशाभूल करणारी माहिती दिली गेली.
खोटे पुरावे आणि बनावट कागदपत्र सादर करण्यात आले. सासवड पोलिसांनी अटकपूर्व जामीन दिलेल्या आणि नोटीस देऊन सोडलेल्या आरोपींची माहिती पौड पोलिसांनी लपवली.याच माहितीच्या आधारे गणेश मोहितेची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली.

कायद्यानुसार गुन्हा?
बचाव पक्षाने दाखल केलेल्या अर्जात, भारतीय न्याय सुरक्षा संहितेचे कलम २२३, २२५, २३४, २३६ यांचा आधार घेत पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने यावर विचार करत, पोलिस प्रशासनास नोटीस बजावली आहे.

Web Title: Did Paud police mislead the court? Serious allegations by the accused's lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.