आई-वडिलांसाठी जेवण बनवले नाही; पतीने पत्नीचा केला खून

By नितीश गोवंडे | Updated: December 24, 2023 17:11 IST2023-12-24T17:11:27+5:302023-12-24T17:11:50+5:30

पती हा मजुरी करत असून त्याला दारू पिण्याचे आहे

did not prepare meals for parents; Husband killed his wife | आई-वडिलांसाठी जेवण बनवले नाही; पतीने पत्नीचा केला खून

आई-वडिलांसाठी जेवण बनवले नाही; पतीने पत्नीचा केला खून

पुणे: आई-वडिलांसाठी जेवण न बनवल्याने महिलेला बेदम मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली. मधुरा तानाजी कांबळे (४२, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तानाजी शिवाजी कांबळे (४३) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलगा पियुष तानाजी कांबळे (१९) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २२ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास दत्तनगर चौकात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी मजुरी करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. आई-वडिलांसाठी बायकोने जेवण न बनवल्याने तो पत्नी मधुरा यांच्यावर चिडला. त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाल्या. बेशुद्धावस्थेतील मधुरा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्याप्रकरणी तानाजीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.

Web Title: did not prepare meals for parents; Husband killed his wife