शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कमला नेहरू रुग्णालयात मिळणार डायलिसीस सुविधा

By admin | Updated: February 2, 2015 02:35 IST

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये केवळ ४८० रुपये इतक्या माफक दरामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे

पुणे : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये केवळ ४८० रुपये इतक्या माफक दरामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. महापालिका आणि लायन्स क्लब आॅफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे. किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना नियमित डायलिसीस करून घ्यावे लागते. खासगी हॉस्पिटलमध्ये ही सेवा अत्यंत महागड्या दरात उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कमला नेहरू रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत या रुग्णालयामध्ये तातडीची वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना याचा चांगला उपयोग होऊ शकेल.