शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

ढमाले मळ्यात बिबट्या अडकला पिंजऱ्यात

By admin | Updated: February 14, 2015 22:53 IST

ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला.

मढ : ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. या वेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.उदापूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन यांनी सांगितले, की उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, गोटीशीवार, सारणी या परिसरात वारंवार दुचाकीचालकांवर बिबट्याकडून हल्ले होत होते. त्यामुळे वनविभागाकडून पाहणी करून पिंजऱ्याची जागा वारंवार बदलली जात असे. त्यानुसारच गुरुवारी (दि. १२) ढमाले मळा येथे रात्री बिबट्याने हल्ला केल्याने शीतल जगताप या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे वनविभागकडून ढमाले मळा येथे पाहणी करून शुक्रवारी (दि. १३) नितीन अहिनवे यांच्या शेतात पिंजरा लावून त्यात सावज म्हणून मेंढी ठेवली होती. त्याच रात्री साडेनऊला बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनपाल एस. बी. महाले, एस. डी. वायभासे, सी. एस. कांबळे, एन. एम. खताळ व वनरक्षक एस. मोमीन, सी. नलावडे, के. एस. नायकोडी, जाधव, पारधी, केदार, गुफेकर, गंवादे घटनास्थळी पोहोचले.या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात रात्रीच हलवण्यात आले. बिबट्या मादी जातीचा असून बिबट्याचे बछडे तेथेच फिरत असावेत, म्हणून परत त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या अंदाजे चार वर्षांचा आहे. (वार्ताहर)आतापर्यंत तीन महिला जखमी४सुनीता गणेश महाकाळ, बाळासाहेब बबन महाकाळ, शीतल जगताप यांना या परिसरात बिबट्याने आतापर्यंत जखमी केले होते. त्यामुळे उदापूर, ढमाले मळा, मांदारणे, अहिनवेवाडी, सारणी, गोटीशिवार या परिसरात बिबट्याची दहशत होती.बछड्यांसाठी लावला पिंजरा...४बिबट्या मादी जातीचा असून बिबट्याचे बछडे तेथेच फिरत असावेत, म्हणून परत त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. वनविभागाचे नागरिकांकडून अभिनंदन४गुरुवारी रात्री एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्या स्थळाची पाहणी करून शुक्रवारीच पिंजऱ्याची जागा बदलली व त्याच रात्री बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे नागरिकांकडून वनविभागाचे अभिनंदन केले जात आहे.