कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला फडणवीस यांनी भाग पाडलं का? सपकाळ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:02 IST2025-03-22T13:01:20+5:302025-03-22T13:02:39+5:30

कोरटकर दुबईला कसं काय पळून गेला, देशाचा गृह विभाग झोपला होता का?

devendra fadnavis force prashant koratkar to help the police escape? Sapkal questions | कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला फडणवीस यांनी भाग पाडलं का? सपकाळ यांचा सवाल

कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला फडणवीस यांनी भाग पाडलं का? सपकाळ यांचा सवाल

पुणे : छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बऱ्याच तपासानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एकीकडे पोलिसांकडून शोध सुरु असताना प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याचे समोर आले आहे. विरोधकांडून यावरून महाराष्ट्र पोलीस आणि सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. अशातच कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडलं का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.  

सपकाळ म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं विधान करणारा विकृत माणूस कोरटकर हा देशाबाहेर पळून गेला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने योजना आणली आहे की, महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा. फडणवीस आणि कोरटकर यांचे हितसंबंध आहेत का? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. त्याला सुरक्षा मिळत असेल कारण. महाराजांचा अपमान केल्यावर त्याला सुरक्षा कस काय मिळते तो पळून कसा जातो. यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही. नाहक औरंगजेबाचा मुद्दा उकरून काढला आहे. जी भाषा तुम्ही औरंगजेबाची कबर उखडायची करता इंग्रज देखील तेवढेच जुलमी होते क्रूर होते. त्यांचे हस्तक म्हणून राहिलेले बरेच लोक आहेत. आजही हे लोक महाराष्ट्रात आहेत. या लोकांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतली या सगळयांची कबरी, पुतळे आणि स्मारक विश्व हिंदू परिषद तोडणार का याच उत्तर त्यांच्याकडे नाही.  

दुबईला पळाला हा कस काय फरार झाला?

सरकार काय करत आहे. कोरटकर दुबईला कसं काय पळून गेला, देशाचा गृह विभाग झोपला होता का? माझा आरोप आहे की कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांची फुस आणि पोलिसांची मदत होते. पोलिसांना मदत करायला देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडलं का? असा आरोपही त्यांनी यावेळी फडणवीस यांच्यावर केला. एखादा मंत्र्याचा मुलगा पळून जातो तर त्याला लागलीच वापस आणलं जातं त्याचं विमान लगेच सापडले जाते. पण आरोपी तुमच्या डोळ्यादेखत दुबईला पळाला हा कसकाय फरार झाला? महाराजांचा अपमान करणारा दुसरा माणूस पुण्यात आहे सोलापूरकरचं डोकं ठिकाणावर नसल्यासाचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.  

Web Title: devendra fadnavis force prashant koratkar to help the police escape? Sapkal questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.