शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणात बुडून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: February 2, 2015 02:29 IST

मित्रांसह खडकवासला धरणावर फिरावयास आलेल्या हृषीकेश संजय जाधव (वय १८, रा. उत्तमनगर) या महाविद्यालयीन युवकाचा

खडकवासला : मित्रांसह खडकवासला धरणावर फिरावयास आलेल्या हृषीकेश संजय जाधव (वय १८, रा. उत्तमनगर) या महाविद्यालयीन युवकाचा धरणात पोहताना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. या आठवड्यातील ही सलग दुसरी घटना असल्याने चौपाटीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.हृषीकेश आज दुपारी उत्तमनगर येथून त्याच्या तीन मित्रांसह खडकवासला धरण परिसरात फिरावयास आला होता. दुपारी तो पाण्यात पोहत होता. त्याचे मित्र काठावरच होते. मात्र काही वेळाने पोहताना त्याला जास्त दम लागल्याने त्याने मित्रांना मदत मागितली. मित्रांनी आरडाओरड सुरु केला. संतोष रजपूत या त्याच्या मित्राने पोहता येत नसतानाही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत तेथीलच एका पर्यटकाने पोहत जाऊन तातडीने हृषिकेशला पाण्याबाहेर काढले. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्यास तातडीने उत्तमनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत हृषीकेश हा कोथरुड येथील पी. जोग कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. त्याला चांगले पोहताही येत होते. असे फौजदार जगनाथ अहिरे यांनी सांगितले.