तोतया पोलिसांना अटक

By Admin | Updated: September 23, 2015 03:40 IST2015-09-23T03:40:57+5:302015-09-23T03:40:57+5:30

पोलीस असल्याची बतावणी करून गुजरात येथील व्यापाऱ्याला ३00 रुपयांना गंडवणाऱ्या दोघा जणांना फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले

Detainee arrested for police | तोतया पोलिसांना अटक

तोतया पोलिसांना अटक

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून गुजरात येथील व्यापाऱ्याला ३00 रुपयांना गंडवणाऱ्या दोघा जणांना फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बुधवार चौकामधील गुजर कोल्ड्रींक्ससमोर घडली.
मेहबूब समीर शेख (वय ३0, रा. अशोक चौक, नाना पेठ), अंकुश परशुराम भिसे (वय ३२, रा. गोकुळनगर, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी भावेश जिवानी (वय ३२, रा. सुरत, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. जिवानी सोमवारी सायंकाळी क्रांती हॉटेल चौकामध्ये उभे असताना त्यांना या दोघांनी अडवले. पोलीस असल्याची बतावणी करून विविध कागदपत्रांची मागणी केली. त्यांच्याकडून दंडापोटी ३00 रुपये उकळले. याबाबत शंका आल्यामुळे त्यांनी दत्त मंदिरासमोरील पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. या पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडले.(प्रतिनिधी)

Web Title: Detainee arrested for police