महिलेच्या मृतदेहाची विटंबना; रुबी हॉल क्लिनिकवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:57 IST2026-01-26T11:57:16+5:302026-01-26T11:57:55+5:30

रुग्णालय प्रशासनाने कोणतीही गैरप्रकाराची घटना घडली नसून पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Desecration of woman's body; Case registered against Ruby Hall Clinic | महिलेच्या मृतदेहाची विटंबना; रुबी हॉल क्लिनिकवर गुन्हा दाखल

महिलेच्या मृतदेहाची विटंबना; रुबी हॉल क्लिनिकवर गुन्हा दाखल

पुणे : रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देताना गंभीर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अखेर कोरेगाव पार्कपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रुग्णालयातील शवगृह प्रभारी आणि ‘डेडबॉडी हॅन्डलिंग स्टाफ’वर मृतदेहाची विटंबना केल्याचा तसेच माहिती दडवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी यश कल्याण भगत (रा. माळेगाव, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

अकलूज येथील सुनीता भगत (२७) यांचे १९ जानेवारी रोजी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह रात्री शवागारात ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी २० जानेवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत रुग्णालय प्रशासनाने गेट पास देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. अखेर मोठ्या वादानंतर मृतदेह रुग्णालयाच्या शवागारातून न देता बाहेरून आलेल्या खासगी रुग्णवाहिकेतून नातेवाइकांसमोर आणण्यात आला. यामुळे मृतदेहाची हाताळणी करताना अथवा विल्हेवाट लावताना गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने कोणतीही गैरप्रकाराची घटना घडली नसून पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, तक्रारीची दखल घेत कोरेगाव पार्क पोलिसांनी संबंधित शवगृह प्रभारी व हॅण्डलिंग स्टाफवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : महिला के शव के साथ लापरवाही: रूबी हॉल क्लिनिक पर मामला दर्ज

Web Summary : रूबी हॉल क्लिनिक पर एक महिला के शव के साथ लापरवाही बरतने का आरोप है। परिजनों ने देरी से सौंपने और गलत तरीके से संभालने का आरोप लगाया है। पुलिस ने मुर्दाघर प्रभारी और हैंडलिंग स्टाफ के खिलाफ मामला दर्ज किया है, शिकायत के बाद कथित तौर पर अनादर और जानकारी छुपाने का आरोप लगाया गया है।

Web Title : Negligence with Woman's Corpse: Case Filed Against Ruby Hall Clinic

Web Summary : Ruby Hall Clinic faces charges of negligence after mishandling a deceased woman's body. Relatives allege delayed release and improper handling. Police have registered a case against the morgue in-charge and handling staff for alleged desecration and concealing information, following a formal complaint.