उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लढणारे नेते, तक्रार करणारे नाहीत - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:37 IST2025-11-21T13:36:21+5:302025-11-21T13:37:09+5:30
जसे नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांची प्रतिमा आहे तशीच एकनाथ शिंदे यांची एनडीएमध्ये प्रतिमा आहे,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लढणारे नेते, तक्रार करणारे नाहीत - उदय सामंत
पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून बालेकिल्ल्यात सुरु असलेल्या फोडाफोडी विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेत तक्रारीचा पाढाच वाचला. यावेळी अमित शाह यांनी माझे या सर्व घडामोडींवर लक्ष असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांना फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, अशी चर्चा आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे हे लढणारे नेते आहेत, तक्रार करणारे नाहीत. जसे नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांची प्रतिमा आहे तशीच एकनाथ शिंदे यांची एनडीएमध्ये प्रतिमा आहे, असे मत त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजीवर व्यक्त केले. कात्रज येथे नियोजित कामासाठी तसेच नवले पूल अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी सामंत गुरुवारी (दि. २०) पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रवींद्र धंगेकर शांत आहेत शांत राहू द्या
शहाजी बापू यांच्याशी बोललो आहे, त्यांची नाराजी आम्ही दूर करू. मुंढवा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः भूमिका मांडली आहे. चौकशी सुरू आहे, अजित पवार यांनी सगळे तपासा असे सांगितले. माझेपण नाव या मुंढवा जमीन प्रकरणात आले. यात माझा काही सबंध आहे का, यात ज्याचा संबंध आहे त्याचा तपास करावा, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. तसेच रवींद्र धंगेकर शांत आहेत शांत राहू द्या, त्यांची शांतता भंग करू नका, असे उदय सामंत म्हणाले.