शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘सोमेश्वर’ची चूक उशिरा लक्षात आल्याची उपमुख्यमंत्र्यांची कबुली

By admin | Updated: September 22, 2014 05:36 IST

सोमेश्वर कारखान्यातील कागदपत्रांची अंतिम तपासणी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये कोणीही अधिकारी अथवा पदाधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्यातील कागदपत्रांची अंतिम तपासणी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये कोणीही अधिकारी अथवा पदाधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही. कारखान्याचा कारभार करत असताना चूक झाली आहे. ती उशिरा लक्षात आल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शेतकरी व युवक मेळाव्यात पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. या वेळी शिवाजीराव भोसले, बी. जी. काकडे, विजय कोलते, दत्ता चव्हाण, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे, संभाजी होळकर, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, रामचंद्र भगत, राजेंद्र कोरेकर, दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, अशोक टेकडे, बाळासाहेब तावरे आदी उपस्थित होते. पुढे पवार म्हणाले, की सोमेश्वर कारखान्याच्या वार्षिक सभेचा प्रकार माझ्या कानांवर आला होता. सभासदांना उसाचा भाव देताना संचालक मंडळाने २00९-१0 मध्ये २६२७ बसत असताना तो २६४८ रूपये दिला. २०१०-११ मध्ये १९०४ रुपये बसत असताना तो २३२० रुपये दिला. या ठिकाणी ४१६ रूपये अधिक भाव दिला. २०११-१२ मध्ये २०८८ रूपये बसत असताना २४५० रूपये दिला. २०१२-१३ मध्ये २३०० रूपये बसत असताना तो २७०० रूपये दिला. या चार वर्षांत सभासदांना १०२ कोटी रूपये जादा दिले. तसेच या वर्षात वाहतूक खर्चही कमी गृहीत धरण्यात आला. तसेच प्रतापगड कारखान्याचा मोठा फटका बसला आहे. ही चूक झाली आहे. मात्र, ती उशिरा लक्षात आली. नवीन हंगामात गाळप चांगले झाल्यास कर्जफेडीसाठी चांगली मदत होऊ शकते. सोमेश्वरचे लेखापरीक्षण करणाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे अशी चूक परत होणार नाही. सोमेश्वर सेवा संघाचा ‘आॅडिट मेमो’ आला. यामध्ये ३ कोटी २२ लाख कमी पडतात. यामधील दोषींना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. मी जे बोलतो ते करतोच, असे सांगितले. कार्यक्रमात पुरुषोत्तम जगताप, सतीश सकुंडे, शैलेश रासकार, विक्रम भोसले, संभाजी होळकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन सतीश सकुंडे, शैलेश रासकर, नितीन भोसले, फत्तेसिंह चव्हाण, विक्रम काकडे यांनी केले. सूत्रसंचालन शशांक मोहिते यांनी केले, तर आभार विक्रम काकडे यांनी मानले. (वार्ताहर)