Coronavirus : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली कोरोनाची दहशत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 05:17 PM2020-03-10T17:17:54+5:302020-03-10T17:19:41+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यात प्रवेश केलेल्या कोरोना व्हायरसची दहशत घेतली असल्याचे दिसत आहेत. एरवी कोणाचीही मुलाहिजा  बाळगता थेट आपल्या 'विशेष शैलीत' समाचार घेणारे पवार कोरोनाच्या बाबतीत मात्र खास जागरूकता बाळगताना दिसत आहेत.

Deputy Chief Minister Ajit Pawar also took the horror of Corona | Coronavirus : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली कोरोनाची दहशत 

Coronavirus : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली कोरोनाची दहशत 

Next

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यात प्रवेश केलेल्या कोरोना व्हायरसची दहशत घेतली असल्याचे दिसत आहेत. एरवी कोणाचीही मुलाहिजा  बाळगता थेट आपल्या 'विशेष शैलीत' समाचार घेणारे पवार कोरोनाच्या बाबतीत मात्र खास जागरूकता बाळगताना दिसत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात हस्तांदोलन करणे तर दूरच पण कपाळाला गंध लावून घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे.  

चीन, इटली आणि इतर देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यावर आता महाराष्ट्रातही पुण्यावाटे प्रवेश केला आहे. पुण्यात दुबईहून परतलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी रात्री उशिरा स्पष्ट झाले. आता जिल्हा, पिंपरी चिंचवड, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन मिळून एकत्र काम करत आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष बैठकही पार पडली. 

नेमके मंगळवारीच पवार यांचे पुणे परिसरात नियोजित कार्यक्रम होते. मात्र त्या कार्यक्रमाच्या आधी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांनी गंध लावू नये असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनासंबंधी बोलताना पवार माध्यमांना म्हणाले की,' आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धुळवडीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आरोग्य विभागाने योग्य खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी स्पष्ट केले

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar also took the horror of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.